adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरती चौधरीची जनसंवाद व पत्रकारीता अभ्यास मंडळावर निवड !!

 धरती चौधरीची  जनसंवाद व पत्रकारीता अभ्यास मंडळावर निवड !!  चोपडा ( संजीव शिरसाठ ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  भुसावळ येथिल धरती चंद्रकांत...

 धरती चौधरीची  जनसंवाद व पत्रकारीता अभ्यास मंडळावर निवड !! 


चोपडा ( संजीव शिरसाठ )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 भुसावळ येथिल धरती चंद्रकांत चौधरी हिची ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ येथील जनसंवाद आणि पत्रकारीता अभ्यास मंडळावर विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार कलम (४०) २ (ई) अंतर्गत सन २०२५–२६ या कालावधीसाठी निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे.

या निवडीची अधिकृत घोषणा विद्यापीठाचे सहायक कुलसचिव (अभ्यास मंडळ विभाग) श्री. राजेश एम. बागुल यांनी अधिकृत पत्राद्वारे केली आहे. धरती चौधरीने एम.ए. (पत्रकारीता व जनसंवाद) या पदवी परीक्षेत सुवर्णपदक (Gold Medal) प्राप्त केले असून तिचा सन्माननीय कुलगुरू व सन्माननीय राज्यपालांच्या शुभहस्ते सत्कार झाला होता.

अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल धरती चौधरीने समाधान व्यक्त करत सांगितले की,“या कार्यात मी निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करीन.” धरती चौधरी ही भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते व डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण (ता. रावेर) चे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जनार्दन चौधरी यांची कन्या आहे. धरतीच्या या यशाबद्दल सर्व शैक्षणिक विभाग, शिक्षकवर्ग, सहकारी व मित्रपरिवार यांचे कडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments