adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी नारायणगांव पोलीस स्टेशन हद्दीमधून बेकायदेशीर 3 गावठी पिस्तूल व 9 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांची दमदार कामगिरी..!!

 दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी नारायणगांव पोलीस स्टेशन हद्दीमधून बेकायदेशीर 3 गावठी पिस्तूल व 9 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 3 ...

 दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी नारायणगांव पोलीस स्टेशन हद्दीमधून बेकायदेशीर 3 गावठी पिस्तूल व 9 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांची दमदार कामगिरी..!! 


 कु: माधवी गिरी गोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 रोजी दहशतवाद विरोधी शाखाचे सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश पवार व स्थानिक गुन्हे शाखाचे सहा.पोलीस निरीक्षक महादेव शेलार, आपल्या पथकासह नारायणगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकातील पो.कॉ ओंकार शिंदे ब.नं 3006 व मोसीन शेख ब.नं 2968 ह्यांना गोपनीय माहिती मिळाली की नारायणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  नारायणगाव एस टी स्टँड जवळ तीन इसम हे 3 गावठी पीस्तोल व 09 जिवंत काडतुसे बाळगत असल्याची अशी माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पथकांने  पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या स्टाफसह नारायणगांव एस टी स्टँड येथून 03 पुरुषानंसह 3 गावठी पिस्तूल व 09 जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणी नारायणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत अधिक पुढील तपास नारायणगांव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे   दिलीप शिंदे पोलीस उप अधीक्षक (गृह) धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा.पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखा, सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे,नारायणगांव पोलीस स्टेशन तसेच दहशतवाद विरोधी शाखाचे व स्था.गु.शाखाचे अंमलदार विक्रमसिंह तपकीर,दीपक साबळे, संदीप वारे, पो.हवा हेमंत विरोळे, पो.कॉ अक्षय नवले, पो.हवा रवींद्र जाधव पो.कॉ मोसीन शेख, पो.कॉ ओंकार शिंदे, पो.हवा. गणेश चंदनशिव, पो.हवा सुनील कोळी, पो.कॉ चेतन पाटील, पो.कॉ संकेत जाधव या पथकाने केली.

No comments