गोरगावले येथे शाकाहारी रॅली व ग्रामगीता कथासप्ताहाचे आयोजन.. (ग्रामगीतेचे प्रचार/प्रसारक जगन्नाथ बाविस्कर यांचा स्त्युत्य उपक्रम) चोपडा प...
गोरगावले येथे शाकाहारी रॅली व ग्रामगीता कथासप्ताहाचे आयोजन..
(ग्रामगीतेचे प्रचार/प्रसारक जगन्नाथ बाविस्कर यांचा स्त्युत्य उपक्रम)
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -;- हेमकांत गायकवाड)
चोपडा (दि.७):- तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील श्रीकृष्ण नगरात दि.९ नोव्हें. ते १६ नोव्हें. २०२५ दरम्यान दररोज रात्री ८ वाजता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता कथासप्ताह ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ग्रामगीतेचे प्रचार/प्रसारक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) हे कथेचे वाचन व विश्लेषण करणार आहेत.
९ नोव्हें. रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिरापासून परम संतश्री बाबा जयगुरुदेवजी महाराज प्रणित शाकाहारी रॅली व भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार आहे. स.१० वाजता परमपूज्य श्री भबुतराव अण्णा महाराज (खर्देकर) यांचा सत्संगाचा कार्यक्रम होईल. ग्रामगीतेतील आठ पंचकातील ४१ अध्यायांपैकी दररोज ५ अध्यायांचे वाचन व विश्लेषण होईल. दररोज सकाळी ध्यानपाठ, भुपाळी व काकडआरती व रात्री ग्रामगीतेची आरती, राष्ट्रसंतांची आरती व राष्ट्रवंदना होईल. दि.१७ नोव्हें.रोजी स.९ वा. ह.भ.प.संजीव महाराज (गलवाडेकर) यांचे काल्याचे किर्तन व स.११ वा.महाप्रसाद भोजन भंडारा होईल.
याप्रसंगी खंजेरी भजनगायक खंडू महाराज (कोळंबा), आर्गनवादक ह.भ.प. गोपाल महाराज (गोरगावले बु), हार्मोनियमवादक विलास महाराज (कापुसवाडी), तबलावादक रंगनाथ महाराज (मुक्ताईनगर) यांचेसह श्री गुरुदेव सेवा मंडळ कोळंबा, श्री माऊली भजनी मंडळ हातेड खुर्द यांची संगीतसाथ लाभणार आहे. याप्रसंगी ओम शांती परिवार, जयगुरुदेव परिवार, महर्षी वाल्मिकी भजनी मंडळ, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, गुरु बाबुनाथ भजनी मंडळ, श्री सुकनाथ भजनी मंडळ, हभप.हिरालाल महाराज धरणगाव, हरिश्चंद्र महाराज, एकनाथ कोळी, माणिक कोळी, रघुनाथ बाविस्कर, प्रताप बाविस्कर, राहुल सोनवणे, कांतीलाल बाविस्कर, अनिल कोळी (कोळंबेकर), प्रवीण कोळी ठाणेकर, प्रकाशनाथ महाराज, सुरेशनाथ महाराज, दिनकर सपकाळे, नाना सपकाळे यांचेही विशेष सहकार्य लाभणार आहे.
कथासप्ताहाचे आयोजन गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील भाविकभक्तं व ग्रामस्थं यांनी केलेले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पाटील, विनोद पाटील, सौ.सुरेखाबाई कोळी, भागवत पाटील, प्रवीण पाटील, डॉ. मोहन पाटील, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, उज्वल पाटील, देविदास पाटील, सुनील चौधरी, अविनाश पाटील, रवींद्र पाटील, मुरलीधर बाविस्कर हे विशेष परिश्रम घेत आहेत. सर्व भाविकभक्तं, माताभगिनी, आबालवृद्ध, तरुणवर्ग व ग्रामस्थांनी ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments