भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दि. २३/११/२०२५ रोजी जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाचे मा. जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ॲड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील हे भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठकीस भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी सौ. सविता प्रविण सुरवाडे तसेच नगरसेवक पदासाठी २२ उभे उमेदवार उभे आहेत. त्यासाठी काॅंग्रेस पक्षाचे निवडणूक कार्यालयात एक बैठक घेऊन निवडणुकीच्या नियोजनाच्या बाबतीत चर्चा केली .या बैठकीला जेष्ठ कार्यकर्ते श्री अजबराव पाटील काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी श्री. योगेंद्रसिंग भैय्या, प्रदेश सचिव प्रविण सुरवाडे शहर अध्यक्ष रविंद्र निकम, एस. सी. सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. एड. शेळके, उमेदवार शेख जमील अमीर , उमेदवार सौ. संगिता भामरे , श्री. फिरोज शेख , उमेदवार इलियास मेमन , इस्माईल शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments