श्रीशैल चिवडशेट्टी बारामती शहरचे नवे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस ठाण्यात आता खमक्या अधिकारी..!! (पुणे जिल्हा प्रतिनिधी) (संपादक -:- ह...
श्रीशैल चिवडशेट्टी बारामती शहरचे नवे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस ठाण्यात आता खमक्या अधिकारी..!!
(पुणे जिल्हा प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलात पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी नुकतेच काढले असून. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांची इंदापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर वाहतूक शाखेचा आठवड्या भरांपूर्वींच पदभार घेतलेले श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे बारामती शहर पोलीस ठाण्याचा पदभार गेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर विलास नाळे इंदापूरला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात तर नव्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या पोलीस निरीक्षक विजयमाला महादेव पवार यांची जिल्हा विशेष शाखा-2 येथे तर पोलीस निरीक्षक निलेश पांडुरंग माने यांची बारामती वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ रुजू हवावे असेही बदली आदेशात म्हटले आहे. देखील पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, लोणी काळभोर, धारावी पोलीस ठाणे तसेच पुणे व मुंबई क्राईम ब्रँचमध्ये यशस्वी कार्यकाळ पार पाडला आहे. बारामती शहर पोलीस ठाणेचे नूतन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून चांगलेच ओळखले जाते. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास नाळे यांची इंदापूर पोलीस ठाण्यात बदली झाली असून. त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, नूतन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेमणुकीमुळे बारामती शहर पोलीस ठाण्याला आता खमक्या अधिकारी मिळाल्याचे बोलले जात आहे.

No comments