चोपडा नगरपरिषद चोपडा सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करिता छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद सभागृह येथे बैठक संपन्न चोपड...
चोपडा नगरपरिषद चोपडा सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करिता छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद सभागृह येथे बैठक संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करिता छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद सभागृह येथे दि.०६/११/२०२५ वार गुरुवार रोजी दुपारी ४.०० वाजता बैठक संपन्न झाली. चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेसंबंधी उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी दि.०६/११/२०२५ वार गुरुवार रोजी दुपारी - ४.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद सभागृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
मतदार याद्या,नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरणे,नामनिर्देशन पत्राची छाननी,नामनिर्देशन पत्र मागे घेणे,निवडणूक लढवणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे,मतदान केंद्रे, ईव्हीएम मशिन,बॅलेटचे युनिट,मतदान अधिकारी,नामनिर्देशन पत्र स्विकारणे,निवडणूक लढवणा-या उमेदवारांचा खर्च,आचार संहितेचे पालन आदी विषयांवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रास्ताविक रामनिवास झंवर,मुख्याधिकारी, चोपडा नगरपरिषद,चोपडा यांनी केले. सुत्रसंचालन व आभार डिगंबर वाघ,नगर अभियंता,चोपडा नगरपरिषद यांनी मानले.या पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अशी माहिती (रामनिवास झंवर) मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद चोपडा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे

No comments