वार्ड क्रमांक २ (अ) – अनुसूचित जमाती पुरुष राखीव अपक्ष उमेदवार : श्री. ठाकूर संतोष राम (ठाकूर सर), न्यू व्यास नगर भरत कोळी यावल ता. प्रतिन...
वार्ड क्रमांक २ (अ) – अनुसूचित जमाती पुरुष राखीव अपक्ष उमेदवार : श्री. ठाकूर संतोष राम (ठाकूर सर), न्यू व्यास नगर
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. २ (अ) मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले श्री. ठाकूर संतोष राम (ठाकूर सर) हे प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत असून, त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वार्डाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने ठाकूर सर यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. 1999 पासून ते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील त्यांना समृद्ध अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा पातळीवर त्यांची ओळख मजबूत आणि प्रभावी आहे.
समाजकार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग सर्वपरिचित आहे. न्यू व्यास नगर परिसरात ते दरवर्षी दुर्गा उत्सव, शिवमहापुराण, भागवत सप्ताह असे विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन मनोभावे करतात. शैक्षणिक क्षेत्रातही ते गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य देत असतात. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना “उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार” बहाल करण्यात आला आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही समस्यांवर ते सदैव तत्पर, संवेदनशील आणि उपलब्ध असतात. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व स्थानिक प्रश्नांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच प्रभावी राहिला आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन असलेले ठाकूर सर आज प्रभागातील जनतेच्या विश्वासाचे प्रमुख केंद्र बनले आहेत.

No comments