फैजपूर नगरपालिका निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांनी वार्ड क्रमांक 1 मधून प्रचारार्थ वाढता प्रतिसाद इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:...
फैजपूर नगरपालिका निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांनी वार्ड क्रमांक 1 मधून प्रचारार्थ वाढता प्रतिसाद
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ताहा नगर तडवी वाडा प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष रशीद नशीर तडवी हे आपल्या स्थानिक वार्ड क्रमांक १ अ मधून अनुसूचित जातीत (एसटी) राखीव मधून निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी हे एक वेळा नगरपालिकेत निवडून गेले आहेत तर एक वेळा त्यांचे वडील स्वर्गीय नशीर शेरखा तडवी आदी निवडून आलेले होते रशीद तडवी हे समाजभिमुख विचारमुखी शहरात मोठी लोकप्रियता मिळवली असून त्यांचे स्वर्गीय वडील नशीर शेरखा तडवी यांचा मनमिळाऊ स्वभाव त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांनी वार्ड क्रमांक 1 मधून मतदारांचे मत जिंकले आहे. ते अनुसूचित जातीत एसटी राखीव वार्ड क्रमांक १ अ मधून अपक्ष उमेदवार असून त्यांची तडवी वाडा ताहा नगर न्हावी दरवाजा पोलीस स्टेशन आदी भागात प्रचारार्थ मोठी मुसंडी मारली असून आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि मतदारांच्या प्रेमाने त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांकडून पाठिंबा मिळत आहे.

No comments