बारामती तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट... पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील ...
बारामती तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट... पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील
( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आदरणीय श्री. चंद्रशेखर यादव यांची पोलीस ठाण्यात संभाजी पुरी गोसावी सातारकरांनी जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत पोलीस ठाण्यात सदिंच्छा भेट घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर धुळे पुणे ग्रामीण अशा विविध जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांनी विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. कर्तव्यदक्ष आणि गुन्हेगारीचा कर्दनकाळ आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून पोलीस खात्यात त्यांना चांगलेच ओळखले जाते. बारामती तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या वर्षभरांतच बदलीने रिक्त झालेल्या जागेवर (दि.9 ऑक्टोंबर) 2025 रोजी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशावरून झालेल्या अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये बारामती वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बारामती तालुका ठाण्याची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे आपल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांंसमवेत आणि त्यांना सोबत घेवुन आपल्या कामाची पोचपावती निर्माण करून पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात.

No comments