प्रभाग क्रमांक १०-अ मधून राजेश करांडे यांना वाढता प्रतिसाद भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिकेच्या सार्...
प्रभाग क्रमांक १०-अ मधून राजेश करांडे यांना वाढता प्रतिसाद
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०-अ मधून अपक्ष उमेदवार राजेश कमलाकर करांडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांमध्ये भक्कम आघाडी घेतली आहे. प्रभागातील विविध ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीबाबत मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. राजूभाऊ करांडे हे नागरिकांच्या कामी सतत धावून जाणारे समाजसेवक म्हणून यावल शहरात प्रसिद्ध आहेत. महाजन गल्ली येथील करांडे वाड्यात राहणारे राजूभाऊ हे धार्मिक उत्सवांमध्ये नेहमी अग्रेसर असतात. गणेशोत्सव, दुर्गा देवी उत्सव, सरदार वल्लभ पटेल जयंती, शिवजयंती इत्यादी कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे.
गोरगरिब, अबालवृद्ध नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या प्रभाव आणि संपर्कामुळे अनेक गरजू लोकांना दवाखान्यात उपचार मिळवून देताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रात्री-बेरात्री मदतीसाठी तत्पर असणे, हा त्यांचा स्वभाव असल्याचे नागरिक सांगतात. सप्तशृंगी मातांची उपासना करणारे राजूभाऊ यांनी पेपर मिल परिसरातील त्यांच्या स्वतःच्या जागेवर सप्तशृंगी देवीच्या मंदिराची स्थापना करून अनेक भाविकांसाठी श्रद्धास्थान उभारले आहे. महाजन गल्ली, देशमुख वाडा, विठ्ठल वाडी या भागांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून तेथे मतदारांकडून त्यांना उल्लेखनीय पाठिंबा मिळत आहे. वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १०-अ मध्ये राजेश करांडे यांचा विजय पक्का मानला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

No comments