adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे चोपडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत आहे त्यांना देखील न्याय द्यावा.. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे शेतकरी कृती समितीची आग्रहाची विनंती...

 "जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे चोपडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत आहे त्यांना देखील न्याय द्यावा.. पालकमंत्री गुलाबराव पाटील...

 "जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे चोपडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत आहे त्यांना देखील न्याय द्यावा..

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे शेतकरी कृती समितीची आग्रहाची विनंती... 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

...चोपडा तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीत घेऊन नंतर वगळण्यात आला.त्या संदर्भात शेतकऱ्यांनी दोन रास्ता रोको आंदोलन देखील केले अद्याप त्यावर निर्णय न झाल्याने शेतकरी कृती समितीच्या सदस्यांनी आज पालकमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील यांची भेट घेऊन आधी पावसाचा खंड,नंतर अतिवृष्टी व आता अवकाळीने  चोपडेकर शेतकरी पूर्ण संपला असून.

   चोपडा तालुक्यातील बरीच माती ही रायचिकन (Heavy black cotton soil)असल्याने त्यात निचरा न झाल्याने सततच्या पावसाने पीक मेली व आता गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असून कापूस काळा पडून सरकी देखील सडली.आपण जिल्ह्याचे पालक आहात आमची देखील काळजी घ्या अशी विनंती त्यांना केली.  पालकमंत्री यांनी सकारात्मक चर्चा केली व लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शेतकरी कृती समितीच्या वतीने एस बी पाटील,प्रशांत पाटील,अजित पाटील ,चंद्रकांत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

No comments