adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे पोस्टर्स स्पर्धा आयोजित

  दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे पोस्टर्स स्पर्धा आयोजित  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दादासाह...

 दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे पोस्टर्स स्पर्धा आयोजित 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय,चोपडा दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रम राज्यशास्त्र विभाग अंतर्गत राबवण्यात आलेत. यामध्ये दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली. ह्या स्पर्धेचा विषय ‘ मतदान जनजागृती’ असा होता. यामध्ये ११ वी व १२ वी कला आणि वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर्स बनवले. हे पोस्टर्स संविधान विषयक जनजागृती करणारे होते. तसेच मतदार म्हणून आपली भूमिका काय? मतदान कसे करावे? यावर अधिक प्रकाश पोस्टर टाकत होते. 


दिनांक २४ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधि निवडणूकीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील ११ वी व १२ वी कला आणि वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत आपला प्रतिनिधि निवडण्यासाठी मतदान केले. ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा जागृत मतदार घडवणे असा असून संविधान अधिक प्रभावीपणे राबविणे असा होता. इयत्ता ११ वी चे दोन वर्ग व १२ वीचे दोन वर्ग असे कला शाखा व वाणिज्य शाखा मिळून एकूण आठ वर्ग होते. ह्या ८ वर्गांसाठी प्रत्येकी एक प्रतिनिधि ह्या प्रमाणे निवडणूक घेण्यात आली. प्रत्येक वर्गाचा विद्यार्थी हा आपल्याच वर्गातील प्रतिनिधीला मतदान करू शकत होता. 


दिनांक २५ नोव्हेंबर रोजी ‘ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. सदरील स्पर्धेसाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून जे विद्यार्थी व नागरिक ही स्पर्धा ऑनलाइन सोडवतील त्यांना प्रमाणपत्र लगेच प्राप्त होईल. ह्या स्पर्धेद्वारे नागरिकांमध्ये संविधान विषयक जनजागृती घडवून आणणे आणि आपले अधिकार व कर्तव्य यांची माहिती करून घेणे हा उद्देश ठेवण्यात आला. 


दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे होते. तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. डी. डी. कर्दपवार सर होते. कनिष्ठ विभागातील उपप्राचार्य श्री. पी. एस. पाडवी व पर्यवेक्षक श्री. ए. एन. बोरसे व कार्यक्रमाचे आयोजक श्री. बाबासाहेब जाधव मंचावर उपस्थित होते. श्री. बाबासाहेब जाधव यांनी संविधान उद्देशीकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ विभागातील उपप्राचार्य श्री. पी. एस. पाडवी यांनी केली. त्यांनी संविधान हे किती महत्वाचे असून संविधान निर्मिती कशी झाली यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी संविधांनाची रचना व मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्य यावर आपले विचार व्यक्त केलेत. संविधान हे मानवासाठी किती प्रभावी आहे जे त्याला मनात नाहीत त्यांची सुरक्षा संविधान करते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कलम ३२ हा ‘भारतीय संविधानाचा आत्मा’ असून त्याचे महत्व सरांनी आपल्या भाषणात अभिव्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी संविधान मानवी मूल्यांसाठी किती महत्वपूर्ण आहे व ते सर्वांना समान संधी कशी देते यावर प्रकाश टाकला. पर्यवेक्षक श्री. ए. एन. बोरसे सर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मतदान जनजागृती स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षीस वितरण करण्यात आले.  

विद्यार्थी मनोगत कु. प्राजक्ता गुरव व कु. कोमल चौधरी इयत्ता १२ वी कला च्या विद्यार्थिनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेकानंद शिंदे यांनी तर आभार श्री. दिनेश अलाम यांनी मानलेत. कार्यक्रमास विशेष सहकार्य श्री. निवृत्ती पाटील यांचे लाभले. कार्यक्रमास श्री. एस. टी. शिंदे, श्री. संदीप पाटील, श्री. प्रमोद पाटील, श्री. भूषण बिरारी, श्री. संदीप देवरे, श्री. अभिजीत देशमुख, श्री. विशाल बोरसे, श्री. दीपक करणकाळ, श्रीमती. अनीता सांगोरे, श्रीमती. निकिता शर्मा, श्रीमती. सुवर्णा बिऱ्हाडे इत्यादि. उपस्थित होते.

No comments