डॉ.राजेश राजोरे यांना आचार्य पदवी (पी.एच.डी) मिळाल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षातर्फे सत्कार पल्लवी हांडके पाटील खामगाव - (संपादक -:- हेमकां...
डॉ.राजेश राजोरे यांना आचार्य पदवी (पी.एच.डी) मिळाल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षातर्फे सत्कार
पल्लवी हांडके पाटील खामगाव -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सुक्ष्म अभ्यासक,निर्भीड,वास्तववादी चतुरस्र पत्रकार व 'सरळ सरळ' चे स्तंभलेखक,अनेक पुरस्काराचे मानकरी,दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक डॉ.राजेशजी राजोरे यांना नुकतेच 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाने' 'मास कम्युनिकेशन व जर्नालिझम' या विषयात 'विद्यावाचस्पती' 'पी.एच.डी' ही पदवी बहाल केली त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय शेतकरी नेते दै. देशोन्नतीचे सर्वेसर्वा असलेले श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांच्या दै.देशोन्नतीतील 'प्रहार' या सदराखाली प्रकाशित झालेल्या १२६० लेखांचा सामाजिक आशय : एक चिकित्सक अभ्यास हा होता. मा. प्रकाशभाऊ पोहरे दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक आहेत त्यांनी आपल्या दै. देशोन्नतीतील 'प्रहार' या सदरा खाली अनेक सामाजिक प्रश्नांवर ज्वलंत प्रहार केलेले आहेत. ह्या विषयावर डाॅ. राजेशजी राजोरे यांनी १२६० लेखांचा सामाजिक दृष्ट्या तौलनिक,चिकित्सक अभ्यास करुन या विषयावर संशोधनपर प्रबंध 'कवयित्री बहिणाबाई चौधरी'उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे 'डॉ.सुधीर भटकर'व 'डॉ.सोमनाथ वडनेरे' यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. विद्यापीठाने डॉ.राजेशजी राजोरे यांना सर्वोच्च समजल्या जाणारी 'आचार्य' या पदवी प्रदान केली आहे.
म्हणून खामगाव येथे दिनांक १८-११-२०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बुलढाणा जिल्हा सह संपर्क प्रमुख डॉ.ऊर्मिलाताई ठाकरे, तालुका प्रमुख श्रीरामभाऊ खेलेदार,माजी तालुका प्रमुख सुभाष सिंह ठाकूर, उप तालुका प्रमुख प्रकाश भाऊ पवार, विभाग प्रमुख हिवरखेड सर्कल भगवान भाऊ भिसे, विभाग प्रमुख कुंभेफळ सर्कल दिनेश भाऊ देशमुख, विभाग प्रमुख पिंपळगाव राजा ज्ञानदेव भाऊ रोठे आदि पदाधिकाऱ्यांनी शाल,बुके व बुक देवून त्या सत्कार केला व त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments