यावल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या – अतुल पाटील भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
यावल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या – अतुल पाटील
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यात २ डिसेंबर रोजी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. यावल शहरातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन महाविकास आघाडीचे नेते अतुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. यावल येथील पद्मावती लॉन्स येथे महाविकास आघाडीचा भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रावेर-यावल विधानसभेचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी उपस्थित होते.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेशदादा चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी शब्बीर शेख, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गोपाळभाऊ चौधरी, तालुकाप्रमुख शरदभाऊ कोळी, कडू नानापाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, काँग्रेस शहराध्यक्ष हकीम शेख, अताऊल्ला शेख, काँग्रेस युवा नेते धनंजय चौधरी, युवा सेनेचे विजय पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन्सार शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अतुल पाटील म्हणाले की, “यावल शहराचे विकासकाम वेगाने पुढे न्यायचे असेल, तर महाविकास आघाडीला मजबूत पाठबळ मिळणे अत्यावश्यक आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने व एकजुटीने काम करून उमेदवारांना विजयी करावे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले

No comments