लियाकत खान पठाण संपादक खरे सव्वाशेर संगमनेर यांचे भावनात्मक आवाहन संगमनेर शहरात गेल्या कित्येक वर्षापासून न मिळणारे चरस गांजा अफू दारू प्...
लियाकत खान पठाण संपादक खरे सव्वाशेर संगमनेर यांचे भावनात्मक आवाहन
संगमनेर शहरात गेल्या कित्येक वर्षापासून न मिळणारे चरस गांजा अफू दारू प्रमाण केव्हा वाढलेय, महाराष्ट्र राज्यात सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत कोण आपल्या हिताची आहे कोण अवैध धारकांना आपले कार्यकर्ते समजून पाठीशी घालत आहे त्यांची पाठ राखण करीत आहे सध्याची तरुण पिढी या व्यसनामुळे बरबाद होत आहे ही वस्तू स्थिती आहेयात शंकाच नाही सध्या संगमनेर तालुका कोठे नेऊन ठेवला हे शोधणे देखील कठीण झाले आहे अत्यंत कमी वयातील मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या गरजा भागवण्यासाठी मारहाण लूटमार मागे पुढे पाहत नाही सध्या संगमनेर शहरात सर्वत्र गुंडागर्दी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे हे नाकारता येणार नाही यास पाठबळ देणारे कोण आहेत हे आत्ता जागृत मतदार बंधू भगिनी यांनी शोधणे देखील महत्त्वाची झाले आहे महिला देखील सुरक्षित नाहीत माझ्या माता बहिणी यांचे बरसत्यात सोने नाणे चोरी जात आहे हा प्रकार देखील आहे सर्रास घडत आहे अनेक माता बहिणी यांची विनयभंग सारखे देखील प्रकार घडत आहेत संगमनेर शहर नावाजलेले असताना यास कुठेतरी गालबोट लागलेले दिसत आहे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याचा देखील दाख दिसत नाहीं अशांत असणारे संगमनेरास नेमके झाले तरी काय या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेणे मतदारा अगोदर मतदार बंधू भगिनी यांनी शोध लावणे देखील महत्त्वाचे झाले आहे संगमनेर तालुका आत्तापर्यंत च्या कालावधीत महाराष्ट्रात गाजलेला तालुका आहे सर्व जाती-धर्माचे लोक गूणया गोविंदाने नांदत असताना केव्हाही जाती धर्म आड आले नाही हा देखील संगमनेर शहराचा इतिहास आहे हा इतिहास सध्या जमा होता दिसत तर नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे मतदार बंधू-भगिनी ताई माई अक्का आता खरोखरच मनापासून सांगतो विचार करा नेमका पक्का आपल्या समस्या आपले प्रश्न सोडवणारी उमेदवार असतील त्यांनाच आपली अत्यंत अनमोल मत देण्याचा प्रयत्न करा कारण पुन्हा पाच वर्ष आपणास सर्व तमाम माता भगिनी यांना देखील पश्चाताप केल्याशिवाय काही पर्याय उरणार नाही असे देखील दिसते निवडणुका आल्या गेल्या केवळ आश्वासनाचे गाजर दाखवून मतदार बंधू-भगिनी माता बहिणी आत्तापर्यंतच्या कालावधीत भूलथापांना बळी पडल्यात आपल्या मतदारसंघातील प्रभागातील म्हणावी तशी विकास कामे करण्यासाठी आपण निवडून दिलेले उमेदवार अकार्यक्षम ठरलेले आहेत केवळ मतदान आले की त्यांना आपल्या वर्गातील मतदार बंधू भगिनी माता बहिणी यांची आठवण येते हा इतिहास आहे एकदा निवडणूक झाली की परत आपल्या आवडीचा निवडून दिलेला उमेदवार आपल्या मतदारसंघात लवकर फरकटत नाही ही फार मोठी शकुंतिका म्हणावी लागेल याकरिता मतदान करतांनी सर्वप्रथम कोण उमेदवार आपली समस्या प्रश्न मार्गी लावू शकतो कोण उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे याचा देखील सध्या शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जो उमेदवार आपण मत देऊन निवडून आणणार त्या उमेदवारास या क्षेत्रातील अभ्यास असला पाहिजे ज्यांना या क्षेत्रातील अभ्यास नाही त्यांना अभ्यास करता करता गेली पाच वर्ष अशीच निघून जाण्याची शक्यता आहे हे माझे परखड मत मी माझ्या तमाम माता बहिणी बंधू-भगिनी यांच्या हितासाठी प्रसिद्धीच्या माध्यमातून लिखाण करत आहे यात कूणा उमेदवार यांना संबोधन लिहिण्याचा हेतू नसून आत्तापर्यंतची परिस्थिती पाहता ही लिहिण्याची वेळ आली आहे तरी मतदार माझ्या बंधू-भगिनी माता भगिनी यांनी तरी सावध होऊन आपले अनमोल मत देण्या अगोदर अनेकदा विचार केला पाहिजे मला काही राजकारण किंवा निवडणुका लढवायचे नाहीत वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करण्याचा मानस असून याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान नुसार सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार देखील प्राप्त केलेला आहे हा माझा अधिकार असल्याने मी माझ्या माता बहिणी बंधू-भगिनी यांना जागृत करण्यासाठी लिखाण करत आहे शब्दांकन लिया कत खान पठाण संपादक खरे सव्वाशेर संगमनेर मोबाईल क्रमांक 96 65 28 20 10 याबाबत आपण आपल्या प्रतिक्रिया व्हाट्सअप च्या माध्यमातून कळू शकतात आपल्या भागातील प्रश्न समस्या याची देखील लेखी स्वरूपात माहिती पाठवावी शक्य झाल्यास फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग देखील सादर करावी त्यास आवश्यक प्रसिद्धी देऊन वाचा फोडली जाईल
शब्दांकन
लियाकत खान पठाण
संपादक खरे सव्वाशेर संगमनेर
मो. क्र. 9665282010
No comments