adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आरोग्य दूतांचा सन्मान सोहळा सम्पन्न

 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आरोग्य दूतांचा सन्मान सोहळा सम्पन्न मंगेश चिवते यांच्या हस्ते ‘अजिंक्य महाराष्...

 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आरोग्य दूतांचा सन्मान सोहळा सम्पन्न

मंगेश चिवते यांच्या हस्ते ‘अजिंक्य महाराष्ट्र न्यूज’चे संतोष लांडे सन्मानित 


मुंबई प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई : दिनांक १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे आरोग्य उपक्रमांतर्गत कार्यरत आरोग्य दूतांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम विशेष रित्या आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संतोष लांडे यांचा विशेष सन्मान मंगेश चिवते यांच्या हस्ते करण्यात आला. चिवते यांनी लांडेंना आरोग्य दूत कृतज्ञता पत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या सामाजिक, आरोग्यविषयक व जनसेवा कार्याचे कौतुक केले. सर्वसामान्य जनतेच्या सेवेत झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.

No comments