मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक – २०२५ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत शहरात विविध प्रभाग मध्ये कॉर्नर बैठक... सति...
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक – २०२५
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत शहरात विविध प्रभाग मध्ये कॉर्नर बैठक...
सतिश गायकवाड सर कार्यकारी संपादक मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रचार : भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत शहरात विविध प्रभाग मध्ये कॉर्नर बैठक...
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक – २०२५ मध्ये प्रभाग २, प्रभाग ३, प्रभाग ४, प्रभाग ५, प्रभाग १० व प्रभाग ११ मधील भाजपा अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ संबंधित प्रभागात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह कॉर्नर बैठक घेऊन, प्रभागातील मतदारांशी संवाद साधला व भाजपा उमेदवारांना बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक – २०२५ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी सौ.भावना ललित महाजन तर प्रभाग क्र. २ मध्ये नईम बिसमिल्ला बागवान, प्रभाग ३ मध्ये अतिक अहेमद हमीद खान, प्रभाग ४ मध्ये जावेद अख्तर खान, प्रभाग ५ मध्ये आसिया ऐजाज खान, प्रभाग १० मध्ये निलोफर बी युनुस खान तर प्रभाग ११ मध्ये जुबेर निसार शाह हे भाजपा तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.


No comments