सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक विद्यार्थी दिवस साजरा" भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- ह...
सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक विद्यार्थी दिवस साजरा"
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल – सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “जागतिक विद्यार्थी दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप माहेश्वरी होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे म्हणाल्या की,
“7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत प्रवेश मिळाला. त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी अतोनात संघर्ष केला याची माहिती देताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्यायले तर गर्जना करायलाच शिकता.”
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून जीवनात उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे असे मोलाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिला तायडे यांनी केले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments