adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामांसाठी,चोपडा तालुका शहरासाठी प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती

 डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामांसाठी,चोपडा तालुका शहरासाठी प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती   चोपडा ...

 डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामांसाठी,चोपडा तालुका शहरासाठी प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामांसाठी,चोपडा तालुका शहरासाठी प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे तरी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला मु.पो.वैजापूर ता.चोपडा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामांसाठी, चोपडा तालुका शहरासाठी प्रभारी अध्यक्ष या पदी दि. ०१/११/२०२५ या तारखे पासून पुढील आदेश होई पर्यंत आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी आपण जिल्ह्यातील प्रत्येक शहर, तालुका व गांवामध्ये आपले नेते खासदार शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करणे साठी सर्व सामान्य जनते पर्यंत त्यांचे,पक्षाचे विचार पोहचवून जनतेच्या मना मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार विषयी आदर्श,आपुलकी,सहानुभूती व विश्वास निर्माण करुन पक्ष संघटन वाढी साठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती.

आपल्या नियुक्तीबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !! वॉय.एस.महाजन सर,कार्या.जिल्हा सरचिटणीस प्रमोद पांडुरंग पाटील जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जळगाव जिल्हा यांनी कळविले आहे

No comments