adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरातील मालमत्तांबाबत अफवा व गैरसमज दूर!“करवाढ नाही… फक्त बदललेल्या बांधकामांचीच नव्याने मोजणी!” — आयुक्त यशवंत डांगे यांची स्पष्टोक्ती; २२ वर्षांनंतर फेरमूल्यांकनाची प्रक्रिया गतिमान

  शहरातील मालमत्तांबाबत अफवा व गैरसमज दूर!“करवाढ नाही… फक्त बदललेल्या बांधकामांचीच नव्याने मोजणी!” — आयुक्त यशवंत डांगे यांची स्पष्टोक्ती; २...

 शहरातील मालमत्तांबाबत अफवा व गैरसमज दूर!“करवाढ नाही… फक्त बदललेल्या बांधकामांचीच नव्याने मोजणी!” — आयुक्त यशवंत डांगे यांची स्पष्टोक्ती; २२ वर्षांनंतर फेरमूल्यांकनाची प्रक्रिया गतिमान  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२३):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता सर्वेक्षणानंतर शहरभरात पसरलेल्या करवाढीच्या चर्चांना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी थेट उत्तर देत स्पष्ट केले की मालमत्ता कराचे यापूर्वी निश्चित केलेले दर कायम आहेत; कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.ज्यांच्या मालमत्तेत गेल्या काही वर्षांत बांधकामात बदल झाला आहे किंवा क्षेत्रफळ वाढले आहे अथवा पूर्वी करच आकारला जात नव्हता, फक्त त्यांनाच मोजमाप घेऊन करयोग्य मूल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे

👉 या नोटिसा मालमत्ता कराच्या नाहीत, तर करयोग्य मूल्य कळविण्यासाठी आहेत.

👉 सर्वांना सरसकट नोटिसा दिलेल्या नाहीत, तसेच कोणतीही सर्वसाधारण करवाढ लागू केलेली नाही

२२ वर्षांनी प्रथमच फेरमूल्यांकन; दर मात्र तेच!

सन २००३ मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत कधीही फेरमूल्यांकन झाले नव्हते. महानगरपालिका अधिनियमानुसार दर ५ वर्षांनी फेरमूल्यांकन अपेक्षित असले तरी मागील २२ वर्षे ही प्रक्रिया झालेली नव्हती. त्यामुळे शहरातील अनेक मालमत्तांचे रेकॉर्ड जुने, अपूर्ण आणि वास्तवाशी विसंगत झाले होते.

यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात—

✔ नव्याने झालेली बांधकामे

✔ बांधकामातील वाढ किंवा बदल

✔ दुरुस्तीमुळे बदललेले क्षेत्रफळ

✔ आतापर्यंत घरपट्टी न लागू केलेल्या मालमत्ता

हे सर्व तपशील नोंदविण्यात आले. नव्याने घेतलेल्या मोजमापानुसार करयोग्य मूल्य निश्चित केले जाईल, परंतु दर तेच राहणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले

महापालिकेवरील वाढता आर्थिक बोजा — आणि आवश्यकतेची मांडणी

गेल्या दोन दशकांत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचा खर्च प्रचंड वाढला आहे

महत्त्वाची खर्च वाढ (वार्षिक):

पाणीपुरवठा व लाईट बिल : ३०–४० कोटी

कर्मचाऱ्यांचे पगार : सुमारे ११० कोटी

विविध नागरी कामे : कोट्यवधी रुपये

मोठे प्रकल्प :

शहरातील रस्ते प्रकल्पाचा सुविहित निधी : ४५ कोटी

पीएम ई-बससेवेचा स्वहिस्सा : ४ कोटी

नव्याने उभे राहत असलेले जिजामाता रुग्णालय : १० कोटी

सारसनगर, सावेडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सर्जेपुरा रंगभवन, नेहरू मार्केट, व्यापारी संकुले व नाट्यसंकुल बांधकामासाठी मोठा निधी उत्पन्नाच्या तुलनेत खर्च झपाट्याने वाढत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत, म्हणून दर न वाढवता फक्त योग्य मोजमापे घेऊन फेरमूल्यांकन करणे आवश्यक झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नागरिकांसाठी उदाहरण – स्पष्ट मार्गदर्शन मा. यशवंत फुलसुंदर यांचे उदाहरण

पूर्वीचे क्षेत्रफळ: ३०.२४ चौ.मी, सध्याचे क्षेत्रफळ (वाढीव बांधकामासह): १४१.९२ चौ.मी,  पूर्वीचे करयोग्य मूल्य: ₹३,०२४, सध्याचे करयोग्य मूल्य: ₹१०,१२४, सर्वसाधारणपणे या करयोग्य मूल्याच्या २७% इतकी घरपट्टी आकारली जाते. या उदाहरणातून स्पष्ट होते की ज्यांच्या बांधकामात/क्षेत्रफळात वाढ झाली आहे, त्यांच्याच करयोग्य मूल्यात बदल होणार असून सर्वसामान्य नागरिकांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही.

आयुक्त डांगे यांची पुन्हा स्पष्टोक्ती:

“ज्यांच्या मालमत्तेत बदल झालाय त्यांनाच करयोग्य मूल्याच्या नोटिसा; सरसकट कोणालाही करवाढ नाही!”

No comments