भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने चोपड्यात चेतना परिषद पत्रकार परिषदेत दिली माहिती विश्राम तेले चौगाव /चोपडा प्रतिनिधी (स...
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने चोपड्यात चेतना परिषद पत्रकार परिषदेत दिली माहिती
विश्राम तेले चौगाव /चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा-- येत्या १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत, १५ जून १८७५ रोजी जन्माला आलेले भगवान बिरसा मुंडा यांनी बालपणापासूनच इंग्रजांच्या विरोधात काम करायला सुरुवात केली.आपला देश पारतंत्र्यात असल्याने सर्व जनजाती बांधवांना एकत्रित करून ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष केला.
त्यांनी "बिरसायत" रचून संपूर्ण समाजाला धार्मिक व सामाजिक एकसूत्ररूपाने आचरण करायची शिकवण दिली. त्यांच्या या कार्याची ब्रिटिशांनी धास्ती घेतली होती. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. भगवान बिरसांचे कार्य तसेच इतरही जनजाती नायकांचे कार्य आताच्या या पिढीला माहीत व्हावे त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यात जनजाती चेतना परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे.
९ नोव्हेंबर रोजी चोपड्यात होणारी चेतना परिषद ही राज्यातील पहिली चेतना परिषद आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या परिषदेसाठी नागपूर येथील विदर्भ चेतना परिषदेचे संयोजक प्रकाशजी गेडाम तसेच पुणे येथील क्षेत्र सह हितरक्षा प्रमुख युवराज जी लांडे आणि भुसावळ येथील प्रांत सह सचिव काशीराम बारेला हे वक्ते म्हणून येणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून शिवपंथ परिवाराचे थावऱ्या पावरा हे उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमध्ये जनजाती समाजाचा गौरव,अस्मिता,अस्तित्व व विकास या विषयांवर सखोल चिंतन होणार आहे. खेतेश्वर मॅरेज हॉल,शिरपूर रोड, चोपडा या ठिकाणी होणाऱ्या चेतना परिषदेला चोपडा,यावल,रावेर, भुसावळ,जळगाव,एरंडोल,धरणगाव, अमळनेर या तालुक्यांमधून जनजाती बांधवांना आमंत्रित केलेले आहे.तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन चेतना परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष भाईदास सोनवणे तसेच सदस्य ज्ञानेश्वर भादले,डॉ.रवींद्र सोनवणे,प्रेमसिंग बारेला,बाबुराव पाटील,प्रताप पावरा,दिलीप बारेला,संजय पवार,प्रवीण बारेला आणि दिनेश बारेला या सदस्यांनी केले आहे.


No comments