धरणगाव राकाँशप पक्षाची कार्यकारिणी जाहीर... शहर कार्याध्यक्षपदी रविंद्र हरी वाघ यांची निवड... विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गाय...
धरणगाव राकाँशप पक्षाची कार्यकारिणी जाहीर...
शहर कार्याध्यक्षपदी रविंद्र हरी वाघ यांची निवड...
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव -- येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व निरीक्षक डॉ सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुका व शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीला चाळीसगावचे माजी आमदार कै. राजीव देशमुख यांना सामूहिक आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी तालुक्याचा कामाचा आढावा दिला तसेच बैठक घेण्याचा उद्देश स्पष्ट करत विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देऊन संघटना बळकट करण्याची भावना व्यक्त केली. बैठकीला जिल्हा सरचिटणीस प्रा एन डी पाटील, वाय एस महाजन सर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, पवार साहेबांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत धरणगाव सरस असल्याचे सांगून सर्वांचे तोंडभरून कौतुक केले. निरीक्षक डॉ सुभाष देशमुख यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तालुका व शहराचा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अहवाल पाठविणार असल्याचे सांगून तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचे कौतुक केले. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देशाच्या बिघडलेल्या परिस्थितीवर मत व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले. संघटना अजून भक्कम करा, लोकांपर्यंत पोहचा, लोकांच्या अडचणी समजून घ्या, शेतकरी - कष्टकरी, वंचित - उपेक्षित, विद्यार्थी - युवक, महिला, आदिवासी इ सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे कार्य करा तुम्हांला आम्ही सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन श्री पाटील यांनी दिले. ज्यांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यांच्यातून सुभाष पाटील, रविंद्र वाघ, बापू मोरे, रमेश महाजन
🔹यांची झाली नियुक्ती...
धरणगाव तालुका (फादर बॉडी)
1) रमेश शांताराम महाजन - उपाध्यक्ष
2) प्रेमराज शांताराम सावंत - उपाध्यक्ष
3) सुभाष दोधू पाटील - सरचिटणीस
4) मनोहर भिवा पाटील - सरचिटणीस
5) सुभाष यशवंत पाटील - तज्ञ सल्लागार
6) वाल्मिक गोकुळ पाटील - कोषाध्यक्ष
7) खलील खान नासिर खान - अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष
8) शरद दौलत पाटील - किसान सेल अध्यक्ष
9) दिनकर राजेंद्र पाटील - किसान सेल उपाध्यक्ष
10) गणेश चुडामण पाटील - किसान सेल उपाध्यक्ष
11) तुकाराम दौलत पाटील - किसान सेल सचिव
12) बापू पूना मोरे - आदिवासी सेल तालुकाध्यक्ष
धरणगाव तालुका (युवक बॉडी)
1) सचिन शिवाजी पाटील - सचिव
2) अजय कांतीलाल सोनवणे - आदिवासी सेल तालुकाध्यक्ष
जळगाव तालुका (युवक बॉडी)
1) गोरख गुलाब गायकवाड - आदिवासी सेल तालुकाध्यक्ष
धरणगाव शहर (फादर बॉडी)
1) रविंद्र हरी वाघ - कार्याध्यक्ष
2) देविदास विठ्ठल धनगर - सचिव
3) समाधान शिवदास महाजन - उपाध्यक्ष
धरणगाव शहर (युवक बॉडी)
1) मोहम्मद जुनेद अब्दुल रहीम - शहराध्यक्ष
2) सागर भास्कर महाले - कार्याध्यक्ष
3) सागर कैलास चव्हाण - उपाध्यक्ष
4) राजिक खान उस्मान खान कुरेशी - उपाध्यक्ष
आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, धरणगाव निरीक्षक डॉ सुभाष देशमुख, चोपडा निरीक्षक प्रा एन डी पाटील, चाळीसगाव निरीक्षक मोहन पाटील, महिला निरीक्षक कल्पिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राजेंद्र धनगर, माजी सरपंच उज्वल पाटील, सरचिटणीस वाय एस महाजन, उद्योजक एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ पदाधिकारी नारायण चौधरी, भगवान शिंदे, रमेश सपकाळे, सुनिल गुजर, अमोल हरपे, गोपाल पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मोहीत पवार, युवक अध्यक्ष परेश गुजर, उपाध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह खंडेराव सावंत, छोटुलाल पाटील, प्रकाश मांग, काशिनाथ मांग, मगनालाल पारधी, किरण पारधी, अजय पारधी, दिनेश पारधी, रुपेश पारधी, राजेश पारधी, दिनेश पाटील, दिनेश भदाणे आदी उपस्थित होते. ही बैठक एकनाथ पाटील यांच्या सर्वज्ञ इंडस्ट्रीज (MIDC) येथे संपन्न झाली. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

No comments