आजपासून वेळोदे ता.चोपडा येथील खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास सुरूवात मच्छिंद्र कोळी गलंगी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी ता.चो...
आजपासून वेळोदे ता.चोपडा येथील खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास सुरूवात
मच्छिंद्र कोळी गलंगी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी ता.चोपडा येथुन जवळच असलेल्या वेळोदे येथे खानदेशातील ग्रामीण भागातील एक नावाजलेली यात्रा असून ती आठ ते दहा दिवस चालते, गावातील प्रत्येकाच्या घरी पाहुणे मंडळीची वर्दळ यात्रा निमित्त असते सासुरवाशीन मुली यात्रा निमित्त गावी येतात. गेल्या 86 वर्षापासून अखंड भरवली जात आहे. त्या यात्रेबद्दलची आख्यायिका अशी की सन 1902 मध्ये वेळोदे येथील कै. मोतीराम तुळशीराम बोरसे यांच्या स्वप्नात खंडेराव महाराज आले, व त्यांना विशिष्ट ठिकाणी जमीन खोदण्यास सांगितले. प्रत्यक्षात जमीन खोदकाम केल्यानंतर श्री खंडेराव महाराज यांची मूर्ती सापडली, त्या ठिकाणाहून मूर्ती हलवून मूर्तीची नवीन जागेत स्थापना करण्यात आली. सन 1938 मध्ये कै. सुकलाल तुळशीराम बोरसे व कै वनाजी सखाराम बोरसे यांनी बाजार चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना केली व तेव्हापासून गावात यात्रा भरवण्यास सुरुवात झाली.
दरवर्षी चंपाषष्ठीला यात्रा महोत्सव चंपाषष्ठीला यात्रा महोत्सवाला सुरुवात होते .आज खंडेराव महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून गावात मिरवणूक काढण्यात येईल. तसेच खंडेराव महाराजांची तळी॓ उठवली जाईल. त्यावेळी पूजा विधी करून खोबरे आणि गुळाचा प्रसाद वाटण्यात येईल, बोरसे भाऊबंद आणि खंडेराव महाराज यांच्या भक्तांच्या घरी तळी उठवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात खंडेराव महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली जाईल.
आषाढी एकादशी ते चंपाषष्ठीपर्यंत बोरसे भाऊबंदकीचा व काही भक्तांचा गावात वांगेसट असतो. पूजा विधी करून भरीत आणि भाकरीचा नैवेद्य देऊन त्या दिवसापासून वांगे खाण्याला सुरुवात केली जाईल.
यात्रेत तमाशाचे आकर्षण
ग्रामीण भागात करणूकीचे साधनं नसल्याने, रसूल भाई पिंजारी, कै. नथुभाऊ भोकरकर सोनवणे यांचा व भिका भीमा सांगवीकर, रघुवीर खेडकर, विठाबाई मांग, हे तमाशे येत असत. यावर्षी सुकलाल भाऊ बाबुलाल भाऊ बोराडीकर व भीमा नामा हे तमाशे येणार असल्याचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. म्हणून या यात्रेत तमाशाचे मुख्य आकर्षण असते.
संस्कृतीचा ठेवा जपणारी यात्रा
गेल्या 87 वर्षापासून ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपणारी ही यात्रा सतत आठ ते दहा दिवस चालते नवसाला पावणारा खंडेराव असल्याने या ठिकाणी दरवर्षी मानता भेटण्यासाठी परिसरातील भाविक येत असतात. या यात्रेला परिसरातील 27 खेड्यांचा संपर्क येत असल्याने परिसरातील शेतकरी शेतमजूर यात्रेत पूर्वी भांड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात या यात्रेत होत असे. लग्नानिमित्ताने व आंधन देण्यासाठीच्या चीज वस्तू या यात्रेतून ग्रामीण भागातील महिला खरेदी करत असत. म्हणून सासर वाशिन मुली पूर्ण परिसरातील या यात्रा निमित्त माहेरी यायच्या. व आजही येतात, ह्या यात्रेत आजही लाखो रुपयाची उलाढाल होत असते. आजही परिसरातील महिला भांड्यांचे खरेदी मोठ्या प्रमाणात करीत असतात भांड्यांचे व्यापारी सोनगीर, धुळे, चोपडा, इत्यादी ठिकाणाहून येतात. यात्रा संपून पंधरा दिवस (तांबड कासार) भांड्याचे व्यापारी या ठिकाणी वास्तव्याला असतात. वेळोदे हे गाव मार्केटिंगचे असल्याने परिसरातील सर्व खेड्यांचा या ठिकाणी संपर्क येत असतो या यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त व महावितरण यांचं सहकार्य लाभत असते. यात्रा निमित्त सर्वत्र साफसफाई करून यात्रेसाठी सज्ज झालेले असल्याचे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य यांचे प्रयत्न सुरू असून, मौत का कुवा, मोठे पाळणे सर्व आलेले आहेत त्यांची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे पंच कमिटीने सांगितले.

No comments