adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोताळा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीची बैठक संपन्न

 मोताळा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीची बैठक संपन्न बैठकीत 10 डिसेंबर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान  अमोल बा...

 मोताळा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीची बैठक संपन्न

बैठकीत 10 डिसेंबर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोताळा:- आज दिनांक 21/11/2025 रोजी ॲड.संदीप तायडे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय मोताळा जिल्हा बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव समजाचे नेते दत्ताभाऊ सूरवसे , बाळासाहेब बळवंतराव , मनोहर दादा कोळी, गजानन पेटे आणि सर्व आदिवासी कोळी महादेव समाज बांधव यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. आगामी हिवाळी अधिवेशनावर ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्याने दत्ताभाऊ पुणे वरून आणि बाळासाहेब बळवंतराव सोलापूर वरून सगळा महाराष्ट्र पिंजून काढत आहे . येणाऱ्या 10 डिसेंबर ला नागपूर येथे मोर्चा करीता जायचं आहे तिथे अंदाजे 150 ते 250 आदिवासी कोळी महादेव समाज बांधव उपोषण करीता बसणार आहे. प्रत्येक घरातील पुरुष,महिला,मुले,मुली पण जायचं आहे या वेळेस परिपत्रक घेतल्या शिवाय उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा ठाम निर्णय आपले दत्ताभाऊ यांनी आपल्या समाज बांधवांना दिला आहे. सर्व आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी एकजूट होऊन वज्रमूठ निर्माण करून आपल्याला नागपूर हिवाळी अधिवेशनावर जायचं आहे.असे आव्हान दत्ता भाऊंनी व उपस्थितीत सर्व आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी केले.

No comments