डोंगराळे येथील तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या:- जगदीश मानवतकर वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- ...
डोंगराळे येथील तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या:- जगदीश मानवतकर
वाशिम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
स्थानिक वाशीम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , मंत्रालय मुंबई यांना जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत लेखन निवेदन देण्यात आले यावर असे नमूद करण्यात आले आहे की,मौजे डोंगराळे ता. मालेगाव जिल्हा नाशिक येथील तीन वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करणारा आरोपी विजय खैरनार याला तातडीने फाशीचे शिक्षा देण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे जेणेकरून या प्रकरणात आरोपीला तात्काळ फाशी देण्यात येईल त्यासोबतच आरोपी विजय खैरनार याच्यावर कोणताही सरकारी खर्च न करता त्याला कोणताही वकील न देता त्याच्यावर गंभीर गुन्ह्याखाली तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून समाजामध्ये अशी कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहील आताच्या काळात लहान मुला मुलींवर लैंगिक अत्याचार वाढत आहेत
म्हणून अशा लहान मुला मुलींसाठी यज्ञ जगदीश दुसाने या तीन वर्षाचे मुलीच्या नावाने यज्ञा कायदा तयार करून अशा आरोपींवर कोणतेही दया मया न दाखवता त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी त्यासाठी कुमारी यज्ञाच्या नावाने कायदा तयार करून हे प्रकरण वेगळ्या कोर्टात समाविष्ट करावे आणि यांच्यासाठी वेगळे कायदे असावेत असे याववेळी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच मौजे ध्यानोरा बुजरुग तालुका वाशिम जिल्हा वाशिम येथील 24 वर्षीय अभिषेक जनार्दन मानवतकर या तरुणाची जातीवादातून हत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना येत असून असे जर कृत्य झाली असल्यास त्या तरुणाच्या खुण्यात समाविष्ट असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे . या आरोपीला सुद्धा तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावी करण्यात आली. तसेच वाशिम सरकारी दवाखान्यात डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे मयत झालेल्या गर्भवती स्व. श्वेता पडघाने या महिलेच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी. सविस्तर वृत्त असे की, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका 25 वर्षीय गर्भवती महिला स्व.श्वेता अजय पडघाने या महिलेला डॉक्टरांनी हलगर्जी ऑपरेशन केल्यामुळे तिचा अति रक्तस्त्राव होऊन सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला. या प्रकरणात आपण लक्ष घालून डॉक्टरांना तात्काळ निलंबित करावे आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांना या महिलेचा व्हीसेरा रिपोर्ट पुढील पोलीस चौकशी करिता देण्याचे आदेश द्यावे. जर या महिलेचा विसेरा रिपोर्ट हा येत्या दहा दिवसात नाही आल्यास शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व ऑल इंडिया ब्लू टायगर सेना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम वर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जगदीश मानवतकर यांनी यावेळी दिला. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल गृहमंत्री आरोग्यमंत्री यांना वर्ग करण्यात आल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे अध्यक्ष जगदीश मानवतकर, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) नेते संतोषजी लांडकर, अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजयजी वैरागडे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते दौलतराव हिवराळे , समनक जनता पार्टीचे नेते गजानन धामणे सर, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे नेते आशिष भाऊ कोकरे , ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे वाशिम तालुका अध्यक्ष आतिश वैरागडे, महादेव वाणी, संतोष लांडगे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), आंबेडकरी कार्यकर्ते राहुल प्रधान सर मातंग समाजाचे नेते आकाश भाऊ तुपसुंदर , ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे राज्य संघटक संविधान भाऊ ढोले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते व ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी चिमुरडीला न्याय देण्यासाठी वाशिम जिल्ह्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असावी इशारा जगदीश मानवतकर यांनी यावेळी उपस्थित प्रसार माध्यमांना दिला.


No comments