खामगावचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – राजेश सोनले यांचा अक्षय कुमार यांच्या हस्ते सन्मान पल्लवी हांडके पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
खामगावचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – राजेश सोनले यांचा अक्षय कुमार यांच्या हस्ते सन्मान
पल्लवी हांडके पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्राचा अभिमान आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव उजळवणारे राजेशजी सोनले सर यांनी कुडो मिक्स मार्शल आर्ट या खेळाद्वारे हजारो विद्यार्थी घडवले आहेत.
आज त्यांना Bollywood Superstar Akshay Kumar यांच्या हस्ते Lifetime Achievement Award प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून व क्रीडा जगतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजेश सरांनी या सन्मानाचे श्रेय अक्षय कुमार सर, मेहुल वोरा सर, जस्मिन मकवाना सर, विस्पी खराडी सर, जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर साहेब, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव साहेब, कुडो असोसिएशन खामगाव जिल्हा बुलढाण्याचे अध्यक्ष महेंद्र भाऊ रोहणकार, टेक्निकल डायरेक्टर सुनील वानखेडे, तसेच सर्व पालक व अंबिका क्रीडा मंडळ यांना दिले. हा सन्मान संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान आहे!
No comments