खर्चाबाबत आदेश नसल्यावरही पैसे काढणे व शासकीय जागेवर अतिक्रमण प्रकरणी अनवर्दे बु येथिल सरपंच अपात्र मच्छिंद्र रायसिंग गलंगी (संपादक -:- हे...
खर्चाबाबत आदेश नसल्यावरही पैसे काढणे व शासकीय जागेवर अतिक्रमण प्रकरणी अनवर्दे बु येथिल सरपंच अपात्र
मच्छिंद्र रायसिंग गलंगी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अनवर्दे बु तालुका चोपडा सरपंच सखुबाई मंगल भिल यांची सरपंच पदावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अपात्र ठरले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की
अनवर्दे बुद्रुक येथील सरपंच सखुबाई मंगल भिल यांनी घरामागे शासकीय जागेवरती अतिक्रम घर बांधकाम केले व खर्चाबाबत आदेश नसल्यावरही पैसे वापरण्याच्या कारणांवरुन जिल्हाधिकारी यांचेकडे उपसरपंच गणेश शंकर पाटील यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 134/2025 दाखल केलेला होता या अर्जावर दोघं बाजुंचे म्हणणे ऐकून तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयातील संबंधितांच्या अहवालावरुन सदरील सरपंच ह्यांनी अतिक्रमण केल्याचं स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे 14 ज 3 अन्वये सौ. सखुबाई भिल यांचे सरपंच पद रद्द केल्याचा आदेश पारित केला असुन याप्रकरणी अर्जदाराचे मार्फत ॲड. अनिल ए. पाटील यांनी तर सामनेवाला यांच्या कडून ॲड. विश्वासराव आर. भोसले यांनी काम पाहिले.
या आदेशाची प्रत जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी चोपडा येथील तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे माहिती साठी पाठवण्यात आले आहे. अशी माहिती अनवर्दे येथील उपसरपंच गणेश शंकर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.

No comments