स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका संदर्भात जनसेवा हॉस्पिटल चोपडा येथे नुकतिच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका संदर्भात जनसेवा हॉस्पिटल चोपडा येथे नुकतिच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जनसेवा हॉस्पिटल चोपडा येथे नुकतिच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.चंद्रकांत बारेला,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या,माजी सभापती जगन काका,विजयाताई पाटील,चो.सा.का.चे विद्यमान संचालक डि. पि.बापू सचिन पाटील,सुचक विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल राजपूत,जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष दिपक वानखेडे,अल्केश माळी तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.
१). स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कामांसाठी चोपडा तालुका व शहर प्रभारी अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत बारेला यांची निवड करण्यात आली असून त्याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाध्यक्षांनी सुपूर्द केले.
२) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्यात येतील,असे जाहीर करण्यात आले. तसेच,परिस्थितीनुसार जर महाविकास आघाडीमध्ये ताण-तणाव निर्माण झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) स्वतंत्रपणे सक्षम आहे, असे सांगण्यात आले.
३). यासोबतच जिल्हाध्यक्षांनी लवकरच विविध सेल प्रमुखांची पदे जाहीर करतील असल्याचेही नमूद करण्यात आले.
या पत्रकार परिषदेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चोपडा तालुक्यातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी अधिक जोमाने सुरू केल्याचा संदेश दिला आहे.

No comments