मलकापूर शहरातील खुलेआमपणे कोयता व आदी वस्तुंची विक्री थांबवा :- प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप पोलिस निरीक्षक, शहर पोलिस स्...
मलकापूर शहरातील खुलेआमपणे कोयता व आदी वस्तुंची विक्री थांबवा :- प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप
पोलिस निरीक्षक, शहर पोलिस स्टेशन मलकापूर यांना निवेदन सादर
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआमपणे कोयता व आदी वस्तुंची विक्री ही खुलेआमपणे होत असतांनाही याकडे पोलीस प्रशासनासह कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे या विक्री होत असलेल्या घातक वस्तुंमुळे एखादी अनुचित घटना घडल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी सदरची विक्री तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे ५ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरात काही दिवसांपासून रस्त्यावरून फिरून काही मुले, महिला व पुरूष हे कोयता व इतर साहित्य खुलेआमपणे विक्री करीत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासनासह कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. नुकतीच नगर पालिका निवडणूक अनुषंगाने आचारसंहीता जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेक निर्बंध या आचार संहितेमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. निवडणुकीची धामधुम सुरू असतांना एखादवेळी वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रसंगी खुलेआमपणे कोयता व इतर साहित्याची होणारी विक्री ही घातक ठरू शकते.
मागील काळात मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. तर काही दिवसांपुर्वीच झालेल्या वादात एकाकडून कोयत्याने वार केल्याची घटनाही समोर आली होती. असे प्रकार घडलेले असतांनाही शहरात सर्रासपणे कोयता व इतर साहित्य रस्त्यावरून फिरून विक्री होत असतांनाही पोलीस प्रशासन याकडे गांभिर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे यावरून दिसून येते. तेव्हा शहरात सुरू असलेली ही विक्री तात्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनाच्या शेवटी अजय टप यांनी दिला आहे.


No comments