टायगर ग्रुप चा माध्यमातून श्री जितेंद्र पाटील यांना आरोग्यदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले फलटण प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) टाय...
टायगर ग्रुप चा माध्यमातून श्री जितेंद्र पाटील यांना आरोग्यदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
फलटण प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
टायगर ग्रुप चा माध्यमातून श्री जितेंद्र पाटील यांना आरोग्यदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ .पै तानाजीभाऊ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त जगातील सर्वात मोठं १०००+ युवकांचं नेतृत्व शिबिर फलटण, या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम शिवभक्त पै. अनिकेतभाऊ घुले आणि टायगर ग्रुप तसेच शिवजल ग्रुप फलटण यांचा माध्यमातून राबविण्यात आला.
या कार्यक्रमात आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल “आरोग्यदूत पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. जितेंद्र पाटील गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा करत आहेत, सदर कार्यक्रमात त्यांना पुरस्कार मिळाल्याने तरुणांसमोर एक उत्तम उदाहरणं प्रस्तुत होऊन तरुणांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व समाजाचा विकास घडेल असे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.एका उत्तम सामाजिक कार्यकर्त्याला पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडुन आनंद व्यक्त करण्यात आला.

No comments