adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषद निवडणुकीत नम्रता पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून सर्वाधिक पसंती

  चोपडा नगरपरिषद निवडणुकीत  नम्रता पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून सर्वाधिक पसंती                     संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आगामी नगरपरिष...

 चोपडा नगरपरिषद निवडणुकीत  नम्रता पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून सर्वाधिक पसंती

    


               संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आगामी नगरपरिषद निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरू आहे.हिवाळ्यामुळे सर्वत्र थंडीची लाट असली तरी नगरपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले


आहे.त्यामुळे प्रचारात थंडीतही अनेक उमेदवारांना घाम येणे साहजिकच आहे.

          चोपडा शहरात अशा थंडीतच काही दिवसापासून एकच चर्चा रंगू लागली होती की,शिवसेनेचा उमेदवार कोण असेल ? कारण भाजप-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराचे नाव जवळ-जवळ निश्चित होते.शहराचे भविष्य कोणाच्या हातात जाईल?शहराचा कायापालट कोण करू शकतो ? शहरात परिवर्तन होईल की नाही ? अशा चिंतायुक्त चर्चा शहरभर चालू असताना १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शहराचे राजकारण थंडीतही कमालीचे तापू लागले.


             शिवसेना-काँग्रेस युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी शहरातील सौ.नम्रता पाटील यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर होताच शिवसेना-काँग्रेस युतीचा कार्यकर्तांसोबत शहरभर वाऱ्याचा वेगाने आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.एक उच्चशिक्षित व यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्या परिचीत आहेत.वेळोवेळी अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.शहराचे माजी उपनगराध्यक्ष यांच्या परिवारातील सदस्य असल्यामुळे सामाजिक व राजकीय वारसाही त्यांना मिळाला आहे.नम्रता पाटील यांचा सामाजिक कार्याचा अनुभव व उच्चशिक्षणाचा फायदा शहराचा सर्वांगिण विकासासाठी नक्की होईल ,अशी गल्ली गल्लीत चर्चा आहे.


            नम्रता पाटील यांना घरातूनच सामाजिक व राजकीय वारसा मिळाल्यामुळे त्यांना शहरातील सामाजिक,सांस्कृतिक आणि व्यापारी वातावरणाची चांगली जाणीव आहे.शिवसेना शहराचा विकासाचा दृष्टीने एक कार्यक्षम महिलेलाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देईल असे सुरूवातीपासूनच बोलले जात होते. नम्रता पाटील यांचा नगराध्यक्ष उमेदवारीनंतर वेगवेगळ्या समाज माध्यमातून सर्वक्षेत्रातील मान्यवरांकडून व जनसामान्यांकडून प्रा.आ.चंद्रकांत सोनवणे व काँग्रेस नेत्यांचे आभार व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. 

शहरातील पथदिवे, नवीन पूलांची निर्मिती ,आधुनिक पशुवैध केंद्र ,खड्डेमुक्त शहर ,पाणीपुरवठ्याची उत्तम सोय ,नवीन गटारींचे व्यवस्थापन ,तरूणांसाठी आधुनिक व्यायाम शाळा,घनकचऱ्याचे व्यवस्थापन,स्पर्धा परिक्षेचा मुलांसाठी नविन ग्रंथालय ,नविन उद्याने यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये शहराचा विकास आ.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांचा नेतृत्वात  घडवून चोपडा शहराचा सर्वांगीण विकास होईल हेच नम्रता पाटील यांचे शहरासाठी लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्यांना शहरातून सर्वाधिक पसंती मिळत आहे.


             नम्रता पाटील यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती  ,बस स्टँड यांच्या विकासामुळे शहराला राज्यात ओळख मिळाली.सोबत शहरात सर्वत्र रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले याच पध्दतीने आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.लताताई सोनवणे यांचा नेतृत्वात नम्रता पाटील हे देखील नगरपरिषदेचा माध्यमातून शहराला "आदर्श चोपडा शहर" म्हणून राज्यभरात ओळख निर्माण करून देतील या अपेक्षेने प्रचारा दरम्यान नम्रता पाटील आणि शिवसेनेच्या सर्वच नगरसेवक उमेदवारांना शहरात उदंड प्रतिसाद मिळत आहे.


        ✍️ प्रकाश क्षीरसागर✍️

No comments