भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नंदा महाजन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिके...
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नंदा महाजन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मध्ये वाढता उत्साह दिसत असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. नंदाताई राजेंद्र महाजन यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील नागरिक त्यांचे मनपूर्वक स्वागत करत असून त्यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महिला शहराध्यक्षा तथा कार्यकर्त्या म्हणून नंदाताई महाजन यांनी होम टू होम असा घराघरातील संवादाचा प्रचार मोहीम हाती घेतली असून या मोहिमेने प्रभागात चांगली जनसंपर्क लाट निर्माण केली आहे. त्यांच्या मते, “सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. जनसेवा हेच माझे ध्येय असून प्रभागातील प्रत्येक नागरिकांसाठी मी सदैव उपलब्ध राहीन.” यावल-रावेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल दादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निधीतून मोठ्या प्रमाणावर निधी आणून प्रभागाचा कायापालट करण्याची त्यांची योजना आहे. मुलं-मुली, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी एक खास हेल्पलाइनदेखील सुरू केली आहे.
नंदाताई महाजन यांच्या सोबत शहरातील महिलांचा मोठा जनसमुदाय सक्रियपणे उभा आहे. प्रभागातील मतदारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने संवाद साधत घरोगरी भेटी चालू केल्या आहेत. त्यांचे पती राजेंद्र महाजन हे उद्योगपती असून प्रगतिशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख आहे. शेती क्षेत्रातील त्यांच्या व्यापक संपर्काचा लाभ नंदाताईंना या निवडणुकीत होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा शांत, मनमिळाऊ स्वभाव आणि समाजातील चांगला जनसंपर्क या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. नंदाताई महाजन यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

No comments