adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग अँक्शन मोडवर:- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या...

 मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग अँक्शन मोडवर:- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी संतप्त प्रतिक्रिया ...

 मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग अँक्शन मोडवर:- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या...  


माधवी गिरी गोसावी (नाशिक जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 नाशिकच्या मालेगांव तालुक्यांतील डोंगराळे गावात अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गावातीलच 24 वर्षीय विजय संजय खैरनार या नराधमांने आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली. या घटनेचा राज्यभरांतून निषेध नोंदविण्यात येत आहे. मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी आता राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर  म्हणाल्या... की ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपीला अटक केली पण केवळ आरोपीला अटक करणे, एवढ्यावरच न थांबता तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या करिता फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे ही आम्ही मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरवठा केला जाणार आहे. लैंगिक अत्याचारांच्या आरोपीला आधी कमी शिक्षा होत होती, ती आता नवीन कायद्यानुसार कठोर शिक्षा केली आहे. या आधीच्या घटनांमध्ये महिला आयोगाकडूंन कठोर शिक्षा देण्यात आली आहे. मात्र तळपायाची आग मस्तकात जाणारी ही घटना आहे. त्या मुलीला वेदना झाल्या असतील तशाच वेदना या आरोपीला झाल्या पाहिजेत, अशी सर्वांची मागणी आहे. मी त्या कुटुंबीची भेट घेणार आहे त्यांचं काय म्हणणे आहे ते जाणून घेणार आहे त्यानंतर पुढील भूमिका मांडणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी दिली.

No comments