adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनेर पुलावर ट्रक पलटी, वाहतूक व्यवस्था ठप्प; सुदैवाने जीवितहानी टळली!

 अनेर पुलावर ट्रक पलटी, वाहतूक व्यवस्था ठप्प; सुदैवाने जीवितहानी टळली!  मच्छिंद्र रायसिंग गलंगी प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी...

 अनेर पुलावर ट्रक पलटी, वाहतूक व्यवस्था ठप्प; सुदैवाने जीवितहानी टळली! 


मच्छिंद्र रायसिंग गलंगी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी ता. चोपडा (ता.६) शिरपूर चोपडा रस्त्यावरील अनेर पुलावर गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर कडून चोपडा कडे जाणारा पोत्यांचे खाली बारदान  घेऊन जाणारा  मालवाहू ट्रक पलटी झाल्याने पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजुस दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पुलावर असलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे या खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही


आज सकाळी , शिरपूरहून चोपड्याच्या दिशेने खाली पोत्यांचे बारदान घेऊन जात असलेला ट्रक (क्र. CG 04 NS 9370) अनेर पुलावरून जात असताना पुलावरील असलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे खड्डे चुकविण्याच्या नादात  चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरच आडवा होऊन पलटी झाला. ट्रक पलटी होताच, त्यातील बारदान रस्त्यावर पसरले आणि त्यामुळे पुलावरील दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला.

सदर अपघात रात्री घडल्याने  अपघात घडल्याची माहिती सकाळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुलावर मोठी वाहनांची रांग लागल्याने आणि वाहतूक थांबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. थाळनेर पोलिसांनी तत्काळ परिस्थितीची माहिती घेऊन पर्यायी मार्गांचा विचार केला, मात्र पुलावरच ट्रक पलटी झाल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता.

सकाळी ११ वाजताच्या सुमारास क्रेणच्या  मदतीने पलटी झालेला ट्रक उचलण्याचे काम सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील अडथळा दूर झाला. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

No comments