चोपडा आगारातर्फे खाटु श्याम,तिरुपती बालाजी व अष्टविनायक दर्शन यात्रांचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा(दि.२२) र...
चोपडा आगारातर्फे खाटु श्याम,तिरुपती बालाजी व अष्टविनायक दर्शन यात्रांचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा(दि.२२) राज्य परिवहन महामंडळ चोपडा आगाराच्या वतीने भाविकांना सुरक्षित व माफक दरात तिर्थ क्षेत्रांचे दर्शन व्हावे म्हणुन चोपडा आगारातर्फे भाविकांसाठी दिनांक ४ डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर खाटु श्याम साठी पहीली बस निघणार आहे.तर तिरुपती बालाजी व अष्टविनायक दर्शन यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.महामंडळाच्या इतिहासात प्रथमच असा प्रयोग राबविण्यात येत आहे. १) खाटु श्याम साठी मार्ग चोपडा - धार - रतलाम - मंदौसर - निमच -सांवरिया सेठ( मुक्काम) सालासर बालाजी परत चोपडा यासाठी प्रती प्रवासी ४६३५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. २) तिरुपती बालाजी साठी चोपडा हुन जळगाव - छ. संभाजीनगर - बिड - तुळजापुर - नळदुर्ग - उमरगा ( मुक्काम) हमुनादाबाद - झहीराबाद - श्री शैल्यम - ( मुक्काम) तिरुपती बालाजी व परत चोपडा यासाठी प्रवास भाडे प्रती प्रवासी ६३४२ रुपये राहील. ३) अष्टविनायक दर्शन साठी चोपडा हुन धुळे - शिर्डी - ओझर - लेण्याद्री - भिमाशंकर - महड -पाली- आळंदी ( मुक्काम) थेऊर - जेजुरी - मोरगाव - सिद्धटेक - श्रीगोंदा - शिरुर - रांजणगाव -परत चोपडा यासाठी प्रवास भाडे प्रती प्रवासी ३०२९ राहील. वरील तिर्थ दर्शनासाठी चोपडा आगारात नाव नोंदणी सुरू आहे.तसेच ज्या गावातुन ३९ प्रवासी उपलब्ध होतील त्या गावातून थेट नविन अद्यावत बस देण्यात येईल. भाविकांनी सदर दर्शन यात्रांचा लाभ घ्यावाअसे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.

No comments