फैजपूर रॉ.कॉ.(अजित पवार गट) आढावा बैठक संपन्न इदू पिजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शुक्रवार दि.०७ नोव्हेंबर रोजी फैजपूर नगरपालि...
फैजपूर रॉ.कॉ.(अजित पवार गट) आढावा बैठक संपन्न
इदू पिजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शुक्रवार दि.०७ नोव्हेंबर रोजी फैजपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या इच्छुक उमेदवारांना राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवारी अर्ज वितरित व इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शे. कुर्बान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
फैजपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेण्यास अनेक इच्छुकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. रावेर विभागाचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे प्रदेश सरचिटणीस श्री.रवींद्र नाना पाटील,सावद्याचे माजी नगराध्यक्ष श्री. राजेशभाऊ वानखेडे, फैजपूर येथील माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान,जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे श्री.सचिन धांडे,शहराध्यक्ष रज्जाक शेख, जिल्हा उपाध्यक्ष नासिर शेख आदी उपस्थित होते.

No comments