adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यातील मराठे गावातील दोन झोपड्या जळून खाक

 चोपडा तालुक्यातील मराठे गावातील दोन झोपड्या जळून खाक  मच्छिंद्र रायसिंग गलंगी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  आज सकाळी साधारणपणे अकरा वाजेच्य...

 चोपडा तालुक्यातील मराठे गावातील दोन झोपड्या जळून खाक 


मच्छिंद्र रायसिंग गलंगी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आज सकाळी साधारणपणे अकरा वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील मराठे गावातील दोन झोपड्या जळून खाक झाल्याची घटना घडली. यामुळे मराठे गावातील एका आदिवासी कुटूंबातील दोन झोपड्या जळल्यामुळे गरिब कुटूंबातील संसारोपयोगी वस्तू, घरकूलाचे ७० हजार रूपयाचा चेक, टिव्ही, एका महिलेच्या डिलीव्हरी साठी जवळ पास ३५ ते ४० रूपये रोख रक्कम, धान्य, व इतर साहित्य जळल्यामुळे आजच हे दोन कुटूंब उघड्यावर आले आहे. अंगावरील कपडे व्यतिरिक्त काहीही शिल्लक राहिले नसल्यामुळे संसार उभा करायचा कसा? 


असा प्रश्न नुकसान झालेल्या कुटूंबातील नागरिकांनी केला आहे. दरम्यान हि आग कश्या मुळे लागली याची माहिती घेतली असता. चुलीतले सरपण हे पूर्णपणे विझवले नाही. अनं त्या दोन घरातील कुटुंब हे शेतीकामासाठी शेतात गेले असता त्यांच्या पश्चात हि घटना घडली. यामुळे मराठे-गणपूर ग्राम पंचायत चे लोकनियुक्त सरपंच भुषण गायकवाड, तलाठी दिलीप बारेला, यांनी घटनास्थळी धाव घेतली असता जळालेल्या दोन झोपड्या चा पंचनामा केला आहे. साधारणपणे साडे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

चंद्रकांत भिल्ल, सुरेश भिल्ल असे नुकसान झालेल्यांची नावे समोर आली आहेत. आगीचे रूप एवढे भयानक होते की संसाराचे भांडी, व इतर साहित्य हे अक्षरश जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन कुटूंबातील नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. सुरेश भिल्ल, नुकसान ग्रस्त नागरिक, मराठे तालुका चोपडा  आजच्या परिस्थितीत आमच्याकडे  कपडे तर नाहीत पण कुठलंही आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड वगैरे वगैरे सर्वच जळाल्यामुळे हातात काही शिल्लक राहिले नाही. आम्ही आदिवासी कुटुंब असल्यामुळे आम्हाला गरीबाच्या संसार उभ्या करण्यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी असे मी हात जोडून विनंती करत आहे

No comments