adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिराळ्यात राख ट्रकांविरोधात युवकांचे ठिय्या आंदोलन रस्त्याच्या बिकट स्थितीवर ग्रामस्थांचा संताप

 शिराळ्यात राख ट्रकांविरोधात युवकांचे ठिय्या आंदोलन रस्त्याच्या बिकट स्थितीवर ग्रामस्थांचा संताप    प्रतिनिधी /शिराळा (संपादक -:- हेमकांत गा...

 शिराळ्यात राख ट्रकांविरोधात युवकांचे ठिय्या आंदोलन रस्त्याच्या बिकट स्थितीवर ग्रामस्थांचा संताप  


 प्रतिनिधी /शिराळा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

डवरगाव एमआयडीसी ते शिराळा फाटा या मार्गावरील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, राख वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांमुळे वाढलेले प्रदूषण आणि सतत घडणाऱ्या अपघातांच्या विरोधात आज स्थानिक युवकांनी शिराळा येथे ठिय्या आंदोलन केले. अनेक तक्रारी आणि निवेदनांनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ संतापून रस्त्यावर उतरले दहा चक्का राख ट्रकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावरून होत असल्याने डांबर पूर्णपणे उखडले आहे आणि रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत धूळ राख हवेत उडत असल्याने विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत सर्व नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि अपघाताचा धोका वाढला आहे. या परिस्थितीवर नाराज झालेल्या युवकांनी ट्रकांना अडवून जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी एका आंदोलकाला ताब्यात घेऊन वलगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केले, अशी माहिती मिळाली या घटनेनंतर युवकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून अनावश्यक दडपशाही केल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला ग्रामस्थांची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सुरू करावे. तसेच रस्ता पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत राख वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांना बंदी घालावी परिसरात आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युवकांनी दिला आहे गावातील हजारो युवक सहभागी होते

No comments