अहिल्यानगर सायबर पोलिसांची मोठी कारवाई! ‘डिजिटल अरेस्ट’ ऑनलाईन फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश..तीन आरोपी गजाआड सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...
अहिल्यानगर सायबर पोलिसांची मोठी कारवाई! ‘डिजिटल अरेस्ट’ ऑनलाईन फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश..तीन आरोपी गजाआड
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२६):-अहिल्यानगर शहरात वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये एक गंभीर ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरण अखेर उघडकीस आले असून, सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगरने मोठी कारवाई करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी संदीप हरिभाऊ कुलथे (रा. सावेडी) यांची तब्बल ₹८,८०,०००/- ची फसवणूक करणाऱ्या टोळीचा हा पर्दाफाश आहे.फिर्यादी यांना २४ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध मोबाईल क्रमांकावरून कॉल व व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करण्यात आला. “मुंबई सायबर सेलमधून बोलत आहोत” अशी खोटी ओळख देत, फिर्यादी यांच्या विरोधात ‘मनी लॉन्ड्रींग, हवाला मनी आणि आयडेंटिटी थेफ्ट’ अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असल्याचे सांगून त्यांना डिजिटल अटक केल्याचा डाव आरोपींनी खेळला. या फसवणूक रॅकेटने मानसिक दडपण आणून मोठी रक्कम वसूल केली होती.या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गु. र. क्रमांक १३/२०२५ भा.दं.वि. कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी तपास अधिक वेगाने व काटेकोरपणे करण्याच्या स्पष्ट सूचना सायबर पोलीस निरीक्षक श्री.सागर ढिकले यांना दिल्या.त्यानुसार PSI सुदाम काकडे,पोहेकॉ. मल्लिकार्जुन बनकर,दिगंबर कारखेले,उमेश खेडकर,निळकंठ कारखेले,रावसाहेब हुसळे या पथकाने तांत्रिक तपास,डिजिटल विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण माहिती संकलन करून आरोपींचा शोध लावला. विजय रंगनाथ चेमटे रा.भाळवणी,ता.पारनेर, जि.अहिल्यानगर,अभिजित अजिनाथ गिते रा.दादेगाव,ता. आष्टी,जि.बीड,सध्या रा. प्रतीक प्लाझा, JSPM कॉलेज शेजारी, नान्हे,पुणे,अक्षय संजय तांबे
रा. सलाबतपूर,ता.नेवासा,जि. अहिल्यानगर,सध्या रा.द्वारका पॅलेस,लक्ष्मी चौक,दत्त कॉलनी, हिंजवडी फेज 1,पुणे चौकशी दरम्यान तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या टोळीने इतरही अनेक फसवणुकीचे गुन्हे केले असल्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन – सावध रहा, सुरक्षित रहा!
सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगरतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की—अनोळखी कॉल, व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल, अनोळखी लिंक, OTP, बँक संबंधित माहिती यावर विश्वास ठेवू नका.स्वतःवर डिजिटल अटक किंवा तत्सम धमकी देणारा कोणताही कॉल आल्यास ते फसवणूक असल्याचे समजा.कोणतीही ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा १९४५ वर संपर्क करा किंवा जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबमें,उपविभागीय पोलीस अधिकारी मश्री. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक सागर ढिकले,PSI सुदाम काकडे,पोहेकॉ. मल्लिकार्जुन बनकर,दिगंबर कारखेले,उमेश खेडकर,निळकंठ कारखेले,रावसाहेब हुसळेआणि पोकॉ अमोल आव्हाड यांनी मोलाची भूमिका बजावली.

No comments