adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रभाग क्रमांक १ मधून रत्नाबाई महाजन प्रमुख दावेदार

प्रभाग क्रमांक १ मधून रत्नाबाई महाजन प्रमुख दावेदार   भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक...

प्रभाग क्रमांक १ मधून रत्नाबाई महाजन प्रमुख दावेदार  



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील प्रचाराला प्रचंड वेग आला असून विविध राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार फेऱ्या व कोपरा सभा सुरू झाल्या आहेत. यावल येथील प्रभाग क्रमांक १ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार रत्नाबाई गणेश महाजन या प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असून प्रभागातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रत्ना ताई महाजन या प्रभागातील प्रत्येक घरांपर्यंत जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रचार करत असून मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. रत्ना ताईंच्या सासू सौ. रुखमाबाईभालेराव यांनी यावल नगरपालिकेचे नेतृत्व करत सभापती व उपनगराध्यक्षा पद सुद्धा भूषविले आहे. तर त्यांच्या पती गणेश महाजन हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असतात. शहरात समाजसेवक म्हणून त्यांची ओळख भक्कम असून नागरिकांच्या सुखदुःखात सतत धावून जाण्याची परंपरा आजही कायम आहे. याच मजबूत जनसंपर्क आणि विश्वासामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये रत्नाबाई महाजन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

No comments