फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अखेर पीएसआय गोपाळ बदने, सेवेतून बडतर्फ मुख्यमंत्र्यांकडून होते कारवाईचे आदेश... कु: माधवी गिरी गोसाव...
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अखेर पीएसआय गोपाळ बदने, सेवेतून बडतर्फ मुख्यमंत्र्यांकडून होते कारवाईचे आदेश...
कु: माधवी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे या 23 वर्षीय तरुणीने (दि.23 ) ऑक्टोबर रोजी मुधदीप हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाणेतील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी चार वेळा अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर यांनी शारीरिक मानसिक छळ केल्याचे मृत्यूपूर्वी तिने आपल्या तळ हातावर लिहून ठेवले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यांत एकच खळबळ उडाली होती. फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या प्रकरणात पीएसआय गोपाळ बदने आणि घरमालक या दोघां फलटण शहर फलटण गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली होती. पीएसआय नवनाथ बदने याच्यावर ब्लॅकमेलिचा आरोप होता. आणि याच प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या फलटण ग्रामीणचा पीएसआय गोपाळ बक्ष बदने यांना अखेर कोल्हापूरपर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ आहे. (आरोप) एका 28 वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदनेवर छळ आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करण्यात आला होता. (अटक) या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याला अटक करण्यात आली होती तो पोलीस कोठडीत होता. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेंवर अनेक गंभीर आरोप होत. महिलांची छेड काढायचा डोळा मारायचा महिलांशी गैरवर्तनाचा इतिहास चांगलाच समोर आला आहे.

No comments