आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात युवकांसाठी ज्ञानेश्वरी चिंतन होणार:- महामंडलेश्वर जनार्धन हरीजी महाराज इदू पिंजारी फैजपूर (संपाद...
आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात युवकांसाठी ज्ञानेश्वरी चिंतन होणार:- महामंडलेश्वर जनार्धन हरीजी महाराज
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताह यावर्षी यावल व रावेर तालुक्याचे वतीने आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात युवक व युवती करीता ज्ञानेश्वरचिंतन हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महामंडलेश्वर जनार्धन हरिजि महाराज यांनी दिली आदिशक्ती मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांचा फिरता नारळी सप्ताह चे यजमान यावल रावेर तालुका सकल हिंदू समाज भाविकांनी स्वीकारले असून हा महोत्सवकरिता सातपुडा चे पायथ्याशी असलेल्या कुंभारखेडा गाव निवडले आहे हा महोत्सव 16 मार्च ते 24 मार्च दरम्यान होईल यामहोत्सवा चे नियोजना साठी तीर्थक्षेत्र रोझोदा येथे कामसिद्ध मंदिराच्या भव्य सभागृहात यावल रावेर तालुक्यातील सर्व महाराज मंडळी व लोकप्रतिनिधी व भाविक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक सम्पन्न झाली प्रास्ताविक डिंगम्बर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले कार्यक्रमाचा उद्देश व आखणी तसेच युवकांना आध्यत्मिक विचाराची गरज याबाबत सविस्तर माहिती सादर केली मुक्ताई संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे यांनी नियोजन स्वरूप व फिरता सप्ताहाचे महत्वपूर्ण चर्चा केली सभेचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्धन महाराज यांनी महोत्सव सुमारे 20 एकर क्षेत्रात होणार असून भव्य दिव्य नियोजन करण्यात येणार असून हजारो विदयार्थी व सातपुड्यातील आदिवासी बांधव व आबाल वृद्ध यांचे उपस्थिती मध्ये महाराष्ट्र तील विदवतरत्न चैतन्य महाराज देगलूरकर यांचे अमृतमय वाणीने संबोधन होणार आहे महोत्सवात ऍड जयवंत महाराज बोधले महंत रामगिरी महाराज गुरुवर्य संदीपन महाराज शिंदे यासह अनेक नामवन्त कीर्तनकार यांची उपस्थिती राहणार आहे या नियोजन बैठकीला आमदार अमोल जावळे धनंजय चौधरी शरद महाजन नरेंद्र नारखेडे भागवत विषवनाथ पाटील भरत महाराज चौधरी दुर्गादास महाराज नेहते भाऊराव महाराज उद्धव महाराज जुणारे महंत नितीन महाराज अहिर विनायक हरणे राजू राणे दीपक चौधरी मारोती परदेशी घनश्याम पाटील अतुल तलेले विजय महाजन रमेश महाजन वसंत बोडे मिलिंद वायकोले सरपंच पुष्कर फेगडे नकुल पाटील मुकेश पाटील उमाकांत मावळे अनिल नारखेडे दूध संघ संचालक नितीन चौधरी धनंजय फिरके मुरलीधर इंगळेयांची उपस्थिती होती उपस्थित भाविकांनी यासाठी देणगी रक्कम जाहीर करून मोठा उत्साह वाढविला या वेळी एम पी एस सि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल डाळिंबी रवींद्र सरोदे यांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला बैठकीला सर्व महाराज मंडळी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आभार व सूत्रसंचालन नरेंद्र नारखेडे यांनी मानले

No comments