कुटुंब हरले, प्रेम जिंकले नांदेडमध्ये आंचलने, मृत प्रियकरांच्या हाताने लावले कुंकू ! वडिलांना भावाला फाशीच द्या ! संभाजी पुरीगोसावी (नां...
कुटुंब हरले, प्रेम जिंकले नांदेडमध्ये आंचलने, मृत प्रियकरांच्या हाताने लावले कुंकू ! वडिलांना भावाला फाशीच द्या !
संभाजी पुरीगोसावी (नांदेड जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रेमात आणि युद्धात सर्वच गोष्टी माफ असतात असे म्हणतात हे अगदी खरं आहे. प्रेम करायला गुन्हा नाही हे पण तितकेच योग्य आहे. पण विश्वासाच्या पायावर कोणतेही नातं उभं असतं. मग ते मित्र मैत्रिणीचं असो, भावा बहिणीचं किंवा पती-पत्नीचा असो, या नात्याला तडा जायला क्षणाचाही वेळ लागत नाही आणि प्रेमात पडलेला माणूस काही करू शकतो असं म्हणतात पण हे प्रेम दुसऱ्यासाठी नाही तर थेट प्रेयसी आंचलने आपल्या मृत प्रियकरासाठी मी आयुष्यभर सक्षम घ्या घरी राहणार आहे. माझ्या वडिलांना आणि भावाला फाशीच द्या अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि या नांदेडच्या जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातील घटनेने नांदेडसह राज्यभरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रेम संबंधाला विरोध असल्यामुळे एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना नांदेडच्या इटवारा परिसरांत गुरुवारी सायंकाळी घडली आहे. यामध्ये आरोपी मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून तरुणाला गोळ्या झाडून तसेच दगडाने ठेचून ठार मारल्याची माहिती समोर आहे. या अमानुष हत्येनंतर प्रेयसी आंचलने आपल्या प्रियकरांच्या हाताने कुंकू लावून मृत-देहासमोर शोकाकुल अवस्थेत विवाह केल्याची घटना संपूर्ण शहरांला हादरवणारी ठरली आहे. इटवारा भागातील सक्षम ताटे असे या तरुणाची गुरुवारी सायंकाळी हत्या झाली होती. मात्र सक्षम आणि आंचल मामिडवार या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते. हे दोघे काही दिवसांत विवाह करणार असल्याची माहिती आरोपी गजानन मामिडवार (मुलीचे वडील) यांना मिळाली होती. पण आंतरजातीय विवाह विरोध असल्याने त्यांचा मुलगा आणि दोन भावासह मिळून सक्षमता खुन केला. पोलिसांच्या माहितीनुसार सक्षमवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. मात्र घटनेनंतर सक्षम ताटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्याआधीं प्रेयसी आंचलने हिने समाजाच्या बंधनाना छेद देत मृत प्रियकरांशी लग्न करण्याचा भावनिक आणि धाडसी निर्णय घेतला. सक्षमच्या पार्थिंवावर तिने हळद कुंकू लावून विवाहाची प्रतीकात्मक विधी केला. माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले, पण ते हरले, माझा प्रियकर मरूनही जिंकला, अशा आक्रोशांत आंचलने टोहो फोडला, हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील तिन्ही यावेळी केली. या प्रकरणात आरोपी वडील गजानन मामिडवार दोन भाऊ आणि अन्य तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतवारा पोलीस ठाण्यात सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने नांदेडचा राज्यभरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

No comments