खडके बुद्रुक येथे ४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्ताने यात्रा उत्सव जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवा...
खडके बुद्रुक येथे ४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्ताने यात्रा उत्सव
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथे सालाबादप्रमाणे दिनांक चार. डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्ताने यावर्षी देखील यात्रा उत्सव भरणार असून या यात्रेत परिसरातील नागरिक,व भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येत असल्याने यासह यात्रेत खेळण्याची दुकाने,पाळणे, गारुडी,यासह विविध प्रकारचे खेळ देखील येत असतात,भाविक व नागरिकांना आस्वाद घेण्यासाठी शेव व जिलेबी चे दुकाने देखील मोठ्या प्रमाणावर येतात तसेच रात्री मनोरंजनासाठी नऊ वाजता श्री बंडू नाना धुळेकर यांचा आदर्श असा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम देखील रात्री होणार असून व पाच तारखेला देखील श्री शालिक शांताराम यांचा देखिल लोकनाट्याचा कार्यक्रम होणार असून गावकऱ्यांच्या वतिने व व्यवस्था म्हणून पंच कमिटी यांचे सहकार्य लाभणार आहे

No comments