प्रभाग क्रमांक ११ मधून सौ मीरा शिंदे व सुरेखा कोळी यांना वाढता पाठिंबा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपा...
प्रभाग क्रमांक ११ मधून सौ मीरा शिंदे व सुरेखा कोळी यांना वाढता पाठिंबा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचाराने शहरात आता प्रचंड वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारापर्यंत पोहोचण्या साठी प्रचार फेऱ्यांचा धडाका सुरू झालेला दिसतं आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सौ मीरा नरेंद्र शिंदे या प्रमुख दावेदार असून त्यांना या प्रभावामध्ये नागरिकांकडून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे ठिकठिकाणी त्यांचं स्वागत सुद्धा केले जात आहे सौ. मीरा शिंदे यांचे पती नरेंद्र शिंदे यांचा जनसंपर्क दांडगा असून गोरगरीब जनतेचे ते नेहमी जनसेवा करत असतात. प्रभागातील अनेक महिला अबालुद्ध यांनी त्यांना अनेक शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे
संजय गांधी निराधार असो श्रावण बाळ योजना असो लाडकी बहीण योजना या कामी ते नेहमी नागरिकांची मदत करीत असतात. यावं नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे अत्यंत विश्वासू व जवळीक त्यांचे हित संबंध आहे अतिशय प्रामाणिक असलेले नरेंद्र शिंदे हे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहे यावल शहराच्या सार्वजनिक विकासाकरिता ते कटिबंध असून त्यांना येथे निवडणुकीत संधी मिळाल्यास ते सदरील प्रकाराचा चौफेर विकास कामे करतील असे त्यांनी सांगितले तरुण वर्गाचा फार मोठा जण समुदाय असलेल्या नरेंद्र शिंदे हे नरु अण्णा म्हणून सर्वत्र परिचित आहे सदरील प्रभागा मध्ये त्यांना फार मोठा पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे

No comments