adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संविधान दिन तसेच स्वच्छ शाळा सुंदर शाळा निमित्त चित्र प्रदर्शन आयोजन

 संविधान दिन तसेच स्वच्छ शाळा सुंदर शाळा निमित्त चित्र प्रदर्शन आयोजन  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे.ई.स...

 संविधान दिन तसेच स्वच्छ शाळा सुंदर शाळा निमित्त चित्र प्रदर्शन आयोजन 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर येथे दि.26 नोव्हेंबर संविधान दिन तसेच स्वच्छ शाळा सुंदर शाळा या विषयावर  भव्य चित्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांकडून  सहभाग नोंदविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य व्ही.एम.चौधरीसर यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले.सदर कार्यक्रमास उपप्राचार्या व्ही.के.शिर्के ,पर्यवेक्षक  व्ही.डी.ब-हाटे ,एस.पी.राठोड ,के.आर. कवळे ,कार्यक्रमप्रमुख एस.बी.वंजारी ,कलाशिक्षिका ए.डी.भोळे सांस्कृतिक मंडळ प्रमुख सौ.वाय.एस.पाटील, उपशिक्षिका एच.जे.तडवी सर्व सन्माननीय शिक्षक  सर्व विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा चित्रांतून सादर केली.तसेच संविधान दिनाचे महत्व सुध्दा सादर करण्यात आले.सदर चित्र प्रदर्शन मा.प्राचार्य यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आले.सदर कार्यक्रमास श्रीमती ए.डी.भोळे , सौ.वाय.एस.पाटील ,एच.जे.तडवी यांचे विशेष सहकार्य मिळाले.सदर चित्र प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांनी विशेष लाभ घेतला.

No comments