तरुणांच्या खुनाचा २४ तासांतच गुन्हा उघडकीस- मारेकरी सख्या भावासह तिघांना ठोकल्या बेड्या; टेंभुर्णी पोलिसांकडून जलद तपास ! कु: माधवी गिरी...
तरुणांच्या खुनाचा २४ तासांतच गुन्हा उघडकीस- मारेकरी सख्या भावासह तिघांना ठोकल्या बेड्या; टेंभुर्णी पोलिसांकडून जलद तपास !
कु: माधवी गिरी गोसावी (सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
टेंभुर्णी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये मौजे. भीमनगर येथील कॅनलमध्ये मिळून आलेल्या अनोळखी बेवारस तरुणाच्या खुनाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले आहे. या खुनातील सख्या भावासह तिघांना अटक करण्यात आली आहे. मयत व्यक्ती दारू पिऊन घरांतील लोकांना त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून त्याचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. आश्रम करंडे (वय ३१) रा. फपाळवाडी ता. बार्शी जि. सोलापूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रणजीत उर्फ सौरभ कारंडे (वय २६) सचिन धर्मा चौधरी (वय ३२) व सोमनाथ उर्फ शाह मोहन तांबे (वय २३) तिघेही रा.फपाळवाडी ता. बार्शी असे पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. मयत आश्रम करंडे यांच्या विषयी परिसरांत पोलिसांनी माहिती घेतली असता त्यास दारूचे व्यसन होते तो नेहमी भांडणे करीत होता घरांतील आणि बाहेरच्या लोकांनाही त्रास देत होता यातूनच खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टेंभुर्णी पोलिसांनी अगदी जलद गतीने खूनाचा छडा लावून आरोपींपर्यंत पोलीस पोचले, यावेळी मयत तरुणाच्या सख्या भावासह तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार स.पो.नि. विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के अजित मोरे पुरुषोत्तम थापटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे पोलीस हवलदार प्रदीप पर्वते संदीप गिरमकर तसेच टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments