adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैध गोमांस विक्रीवर तोफखाना पोलिसांचा छापा..पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक भांबळ ॲक्शन मोडवर

 अवैध गोमांस विक्रीवर तोफखाना पोलिसांचा छापा..पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक भांबळ ॲक्शन मोडवर  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपाद...

 अवैध गोमांस विक्रीवर तोफखाना पोलिसांचा छापा..पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक भांबळ ॲक्शन मोडवर 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.५):-शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने आज (दि.५ नोव्हेंबर २०२५) कारवाई करत ६० किलो अवैध गोमांस जप्त केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोठला झोपडपट्टी परिसरात छापा टाकला असता,गोमांस विक्रीचा धंदा सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत आरोपी फिरोज जमशेर शेख (वय ५०, रा. कोल्हार, झोपडपट्टी, ता. वि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अंदाजे १७,४००/रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार,आरोपीने आपल्या घरातच गोमांस साठवून विक्रीस ठेवले होते.पोलिसांनी जागेवरून ८० किलो गोमांस,वजनकाटा, सुरा,सत्तुर अशा साहित्यांसह गोमांस जप्त केले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार विजय विल्यम हिवाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तोफखाना पोलीस निरीक्षक श्री. जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलीस अंमलदार रियाज इनामदार, भानुदास खेडेकर,योगेश चव्हाण, सुनील चव्हाण,नितीन उलगमुले, सुरज वाबळे,सुधीर खाडे,सुमित गवळी,अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन,सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे, दादासाहेब रोहकले यांनी केली. या कारवाईने शहरातील अवैध मांस विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

No comments