adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून द्या; शहराच्या पाणी प्रश्न व सर्व समस्या सोडविण्याचा माझा शब्द – अजितदादा पवार

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून द्या; शहराच्या पाणी प्रश्न व सर्व समस्या सोडविण्याचा माझा शब्द – अजितदादा पव...

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून द्या; शहराच्या पाणी प्रश्न व सर्व समस्या सोडविण्याचा माझा शब्द – अजितदादा पवार 


अमोल बावस्कार बुलढाणा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभारलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रसाद जाधव आणि शहरातील सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या विजयानंतर शहरातील पाणीपुरवठ्यासह सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचा ठाम शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी मलकापूरकरांना दिला.२६ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथे भरलेल्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. शहराच्या पाणीटंचाईच्या दीर्घकालीन समस्येवर भाष्य करत त्यांनी म्हटले, “आपण मला नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून द्या. शहराच्या पाणी प्रश्नासह इथल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यास मी शब्द देतो.” त्यांच्या भाषणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


शहराचा १००% पाणी प्रश्न मार्गी लावणार अजितदादांनी स्पष्ट केले की मलकापूर शहराचा पाणीपुरवठा प्रकल्प कोट्यवधी रुपयांचा असून, सध्याच्या १६ किमी पैकी ६ किमी पाईपलाइन अतिजुणी आणि जीर्ण झाल्याने पाणी गळती व टंचाईची समस्या वाढली आहे.“ही परिस्थिती कायमची बदलण्यासाठी आवश्यक निधी आणून, पाईपलाइन बदलण्याची व जलस्रोत वाढविण्याची कामे तातडीने मंजूर करून घेऊ. उन्हाळ्यात नागरिकांना टँकरच्या प्रतीक्षेत बसावे लागते, ती वेळच येऊ देणार नाही,” असा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला.

उमेदवारांची मजबूत टोली:-  मैदानात सभेला जिल्हा व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांसह मोठी उपस्थिती होती. पक्षाने उभारलेले सर्व उमेदवार सक्षम, अनुभवी व विकासाभिमुख आहेत, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रसाद जाधव यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात शहरातील रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, पाणीपुरवठा सुधारणा, महिलांसाठी सुविधा, तसेच तरुणांसाठी रोजगार निर्मिती असे अनेक विकासाचे मुद्दे मांडले. “शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत; नागरिकांनी निश्चिंतपणे आमच्यावर विश्वास ठेवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादस्थानिक नूतन विद्यालय च्या  मैदानावर आयोजित सभेला प्रचंड गर्दी झाली होती. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना जोरदार पाठिंबा दिला. विविध ठिकाणी पक्षाच्या झेंड्यांनी व घोषणांनी वातावरण दणाणून गेले.अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या प्रचार मोहिमेला या सभेमुळे मोठी गती मिळाल्याचे जाणवत होते. अजितदादा पवार यांचे आश्वासन, उमेदवारांची विकासनिष्ठ टीम आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे.

No comments