गुगल मॅपवर सबस्टेशन हेरून कॉपर चोरी..! LCB ची धडाकेबाज कारवाई..आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा उलगडा..! सचिन मोकळं अ...
गुगल मॅपवर सबस्टेशन हेरून कॉपर चोरी..! LCB ची धडाकेबाज कारवाई..आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा उलगडा..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२५):-जिल्ह्यात वाढत असलेल्या कॉपर चोरीच्या घटनांवर अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवत आंतरराज्यीय चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.गुगल मॅपवरील लोकेशनचा वापर करून एमएसईबीच्या सब स्टेशनची पाहणी करत कॉपर चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.त्यांच्या ताब्यातून ४ लाख ४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी 132 केव्ही उपकेंद्र, खांडके (ता.नगर) येथे अज्ञात चोरट्यांनी कॉपरची पाईप व बेल्ड चोरी केली होती. याबाबत अरविंद एकनाथ बडे (वय 53, रा. सावेडी) यांनी फिर्याद दिल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 998/2025 बी.एन.एस. क. 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.कॉपर चोरीच्या वारंवार तक्रारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली
पीएसआय समीर अभंग, पोलिस अंमलदार राहुल द्वारके,लक्ष्मण खोकले,विष्णु भागवत,फुरकान शेख,भिमराज खर्से,राहुल डोके, अमोल आजबे,जालिंदर माने, योगेश कर्डीले,प्रशांत राठोड, प्रमोद जाधव आणि महादेव भांड यांचे पथक तयार करण्यात आले.पथकाने जिल्ह्यातील सर्व चोरीच्या घटना ठिकाणांना भेट देऊन तपासाची दिशाभूल करणार्या सर्व धागेदोरे एकत्र केले.सलग 8 दिवसांच्या बारकाईच्या तपासानंतर आरोपींचे लोकेशन मिळाले आणि पथकाने मोठी कारवाई केली.ताब्यात घेतलेले आरोपी मध्यप्रदेशातील आहेत.बबलू उर्फ हुसेन रेहमत खान (वय 38),समीम कमरअली खान (वय 32),शकील लईस खान (वय 32),कासिम इदरीस खान (वय 30),शाहरुख साबीर खान (वय 23) अरे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

No comments